Close

तारक मेहता मधील टप्पू भव्य गांधीचे टेलिव्हिजनवर कमबॅक? (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Tappu aka Bhavya Gandhi To Make Comeback On Anil Kapoor Bigg Boss OTT 3)

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम 'टप्पू' आता 'बिग बॉस ओटीटी सीजन 3' मध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'बिग बॉस ओटीटी 3' च्या निर्मात्यांनी भव्य गांधीशी यासंदर्भात संपर्क केला आहे.

भव्य गांधी पहिल्यांदा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये टप्पूच्या भूमिकेत दिसला होता. पण त्यानंतर काही वर्षांनी त्याने या शोचा निरोप घेतला. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून आपली लोकप्रियता टिकवून आहे. या शोमधील प्रत्येक पात्राला खूप पसंती मिळाली. या शोमध्ये ९ वर्षे काम केल्यानंतर भव्यने शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता 'टप्पू' टीव्हीवर कमबॅक करणार आहे.

होय, रिपोर्ट्सनुसार, भव्य गांधी 'बिग बॉस ओटीटी सीजन 3' मध्ये दिसणार आहे. अनिल कपूर होस्ट करणार असलेल्या 'बिग बॉस ओटीटी 3' च्या निर्मात्यांनी भव्य गांधी यांच्याशी संपर्क साधला आहे. मात्र, 'टप्पू' रिॲलिटी शोमध्ये सहभागी होणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. भव्य गांधी यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये टप्पूची भूमिका साकारली होती पण २०१७ मध्ये त्यांनी शो सोडला.

भव्य गांधींव्यतिरिक्त तनुश्री दत्ता, मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा उष्माय चक्रवर्ती, हेमा मालिनी यांची मुलगी अहाना देओल आणि संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त यांनाही 'बिग बॉस ओटीटी 3' साठी अप्रोच करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, कोणाच्या जाण्याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याशिवाय 'बिग बॉस ओटीटी 3'च्या निर्मात्यांनी नुपूर सेननलाही संपर्क केल्याचे बोलले जात आहे. नुपूर सेनन एक अभिनेत्री आणि गायिका आहे जी बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेननची बहीण देखील आहे. नुपूर टायगर नागेश्वर राव आणि नूरानी चेहरा यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते.

दरम्यान, निर्मात्यांनी चाहत्यांना 'बिग बॉस OTT 3' च्या प्रीमियरच्या तारखेबद्दल देखील माहिती दिली आहे. हा ब्लॉकबस्टर रिॲलिटी शो २१ जूनपासून OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema वर स्ट्रीम होईल. यावेळी बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर हा शो होस्ट करताना दिसणार आहे.

Share this article