स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा पार केला. या निमित्ताने मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ठरलं तर मग मालिकेच्या संपूर्ण टीमने बाप्पाचं दर्शन घेतलं. या खास प्रसंगी निर्माते सुचित्रा बांदेकर, सोहम बांदेकर आणि आदेश बांदेकर उपस्थित होते.
ठरलं तर मग मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग बनलं आहे. याच प्रेमापोटी सातत्याने नंबर वन राहण्याचा मान ठरलं तर मग मालिकेला मिळाला आहे. प्रेक्षकांचं हे प्रेम आणि बाप्पाचा आशीर्वाद असाच पुढच्या प्रवासात मिळावा ही भावना संपूर्ण टीमने या खास प्रसंगी व्यक्त केली.