Close

तेजस्वी प्रकाशने छोट्या पडद्यापासून काही काळ ब्रेक घेण्याचा घेतला महत्त्वपूर्ण निर्णय (Tejasswi Prakash Has Taken A Break From Television)

'बिग बॉस 15'ची विजेती आणि 'नागिन' या मालिकेतील भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तिने छोट्या पडद्यापासून काही काळ ब्रेक घेण्याचं ठरवलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलं आहे.

'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तेजस्वी म्हणाली, "मला दुसऱ्या माध्यमांमध्येही काम करायचं आहे. पण असं म्हणतात ना, की कधीच नाही म्हणायचं नसतं. माझ्या आयुष्यातून मी ही गोष्ट शिकलेय. त्यामुळे मी टीव्ही शोजमध्ये पुन्हा कधीच काम करणार नाही असं म्हणणार नाही. कारण छोट्या पडद्यामुळेच मी इथवर पोहोचले आहे."

"योग्य वेळी तुम्ही योग्य मालिका स्वीकारल्या, तर तुम्हाला लोकप्रियता लगेच मिळू शकते. आज लोक मला ओळखतात. पण मला याच ओळखीचा उपयोग करत आणखी चांगलं आणि वेगळं काम करायचं आहे. त्यासाठी मला टेलिव्हिजनपासून ब्रेक घ्यावा लागेल", असं तिने पुढे सांगितलं आहे.

तेजस्वीला अद्याप बॉलिवूडमध्ये कोणता प्रोजेक्ट मिळालेला नाही. याविषयी ती म्हणाली, "बॉलिवूडमध्ये काम मिळवणं कठीण आहे. पण प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळत नाही. कदाचित थोडा वेळ लागेल, पण हे अशक्य नाही."

तेजस्वीने 'मन कस्तुरी रे' या मराठी चित्रपटातही काम केलंय. तिच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं झाल्यास, गेल्या दोन वर्षांपासून ती अभिनेता करण कुंद्राला डेट करतेय. 'बिग बॉस'च्या घरात दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

Share this article