बेवारस मुलांची कोणी फुकट जबाबदारी घेत नाही. त्यांचं शोषण करून त्यांच्याकडून भरभरून कसा फायदा मिळवता येईल हा विचार समाजातील बहुतांश लोक करत असतात. अशाच बेवारस मुलांच्या शोषणावर आधारित तेलगू चित्रपट ‘गीता’ आता ९ ऑक्टोबर २०२३ पासून 'अल्ट्रा झकास' या ओटीटीवर मराठीत पहायला मिळणार आहे.
चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ‘विश्व आर राव’ यांनी केले असून चित्रपटात महाराष्ट्राची ‘हेबा पटेल’ आणि तेलगू सुपरस्टार ‘सुनील’ यांनी अभिनय केला आहे. चित्रपटाची कथा गीता या मुलीभोवती फिरते. गीता स्वतः अनाथ असल्याने बेवारस अनाथ मुलांना लोकांनी दत्तक घ्यावं यासाठी प्रयत्न करते. या दरम्यान भगवान नामक व्यक्ती अनाथ मुलांसोबत काहीतरी चुकीचे करतो आहे याची तिला चाहूल लागते. पोलिसांची मदत घेऊन ती भगवानच्या गैरकृत्याचा पाठलाग करते.