Close

मोठ्या प्रतिक्षेनंतर ‘या’ अभिनेत्रीने खरेदी गेले सुशांत सिंह राजपूतचे घर (The actress has bought Sushant Singh Rajput’s house in Mumbai)

बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाला आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले. रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आणि तिला जेलमध्ये जाण्याची वेळ देखील आली. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर करण जोहर हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. सुशांत सिंह राजपूत याचे त्याच्या मुंबईच्या राहत्या घरी निधन झाले.

सुशांत सिंह राजपूत याचे मुंबईतील ज्या घरात निधन झाले, ते घर खरेदी करण्यासाठी कोणीही तयार नव्हते. मालकाला नवा भाडेकरू मिळत नव्हता. सुशांत सिंह राजपूत याचे हे घर भाड्याचे होते. मात्र, सुशांत सिंह राजपूत याचे त्याच घरात निधन झाल्यानंतर त्या घरात कोणीही राहण्यासाठी येण्यास तयार नव्हते.

आता नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार सुशांत सिंह राजपूत याच्या घराला नवीन मालक हा मिळाला आहे. तब्बल तीन वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूत याच्या घरामध्ये कोणीतरी राहण्याठी येत आहे. विशेष म्हणजे सुशांत सिंह राजपूत याचे ज्या घरात निधन झाले ते घर आता एका अभिनेत्रीनेच खरेदी केले आहे.

द केरळ स्टोरी चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री अदा शर्मा हिनेच हे घर खरेदी केले आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाच्या यशानंतर अदा शर्मा ही मुंबईमध्ये घर शोधत होती आणि ती आता सुशांत सिंह राजपूत याच्या घरामध्ये राहण्यासाठी येणार आहे. अजून अदा शर्मा ही सुशांत सिंह राजपूत याच्या घरामध्ये शिफ्ट झाली नाहीये.

पुढच्या काही दिवसांमध्येच अदा शर्मा ही सुशांत सिंह राजपूत याच्या या घरामध्ये शिफ्ट होणार आहे. मात्र, यावर अजून अदा शर्मा हिने काही भाष्य हे केले नाहीये. काही वेळापूर्वीच याबद्दल अदा शर्मा हिच्या टिमला संपर्क करण्यात आला होता, याबद्दल विचारण्यासाठी तर ही बातमी खरी असल्याचे सांगितले गेले आहे. म्हणजे आता हे स्पष्ट झाले की, सुशांत सिंह राजपूत याच्या घरामध्ये अदा शर्मा ही राहण्यास येणार आहे. विशेष म्हणजे ज्या घरात सुशांत सिंह राजपूत याचे निधन झाले, त्या घराची किंमत कोट्यावधीच्या आसपास आहे. १४ जून २०२० रोजी या घरामध्ये सुशांत सिंह राजपूत याचे निधन झाले. सुशांतचे हे घर बांद्रा येथे आहे. ज्या घरात आता अदा शर्मा ही राहणार आहे.

Share this article