Close

सेक्स एक्स्पर्ट होण्याची कला (The Art Of Being A Sex Expert)

सेक्स ही एक उत्तम कला आहे. सातत्यानं करण्याची कृती आहे. ती मन लावून केल्यास पती-पत्नी दोघांनाही चांगलं सुख देते. दररोज नवीन अनुभव देते.

आपली परंपरा, संस्कृती व चालीरितीनुसार लग्न हा लैंगिक संबंध ठेवण्याचा अधिकृत परवाना आहे. लग्न झाल्यावर हक्काने घेण्यासारखं ते सुख आहे. तरुणपणी कामवासना प्रबळ होते. पण ती दाबून ठेवावी लागते. लग्नानंतर ही दबलेली वाफ उफाळून येते. त्यामुळे हे सुख वारंवार घ्यावंसं वाटतं. मात्र ते सगळ्यांनाच जमतं असं नाही. कारण सेक्स ही एक उत्तम कला आहे. सातत्यानं करण्याची कृती आहे. ती मन लावून केल्यास पती-पत्नी दोघांनाही चांगलं सुख देते. दररोज नवीन अनुभव देते. मात्र प्रत्येक जण असं सुख देण्याघेण्यात पारंगत नसतो. पण व्हायला काय हरकत आहे? प्रयत्नांती परमेश्‍वर म्हणतात. या उक्तीनुसार तुम्ही परफेक्ट सेक्स पार्टनर कसे बनू शकाल, ते पाहूया.

घरातील टापटीप, कपड्यांची रंगसंगती, खाण्याची आवडनिवड अशा गोष्टींमध्ये आपण जोडीदाराची मर्जी राखण्याचं भान ठेवतो. पण सेक्ससंबंधांत काही छोट्यामोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. अन् जोडीदाराची कळत नकळत नाराजी ओढवून घेतो. काही पार्टनर आपली नाराजी बोलून दाखवतात, तर काही जण फुरंगटून बसतात. मग शरीरसंबंधाची मजा थोडी कमी होते. या संबंधांत तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. तेव्हा अशा गोष्टी टाळण्यासाठी छोट्यामोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. अन् कामजीवन आनंदाने, समाधानाने घेण्यासाठी या काही गोष्टींचं पालन करा.

शरीर स्वच्छता
लैंगिक सुख हे शरीराशीच संबंधित असल्याने त्यासाठी शरीर तयार असणं किंवा तयार करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येकानं आपलं शरीर स्वच्छ, निरोगी ठेवलं पाहिजे. त्वचा स्वच्छ, कोमल, तजेलदार असली तर जोडीदारास अधिक आकर्षित करते. कित्येक लोक सेक्स संबंधापूर्वी आंघोळ करतात, ते यासाठीच. अन् ते चांगलंच आहे. पती कामावरून घरी येणार, तर पत्नी घरकामानं दमली असणार. घामाने अंगास दुर्गंधी येत असणार. घामाचा वास सहसा कोणास आवडत नाही. तेव्हा अंग स्वच्छ करणं, अंगास पावडर लावणं, परफ्युमचा वापर करणं या गोष्टी अवश्य कराव्या व एकमेकांस कामोत्तेजित करावं. चांगल्या प्रकारे कामोत्तेजित झाल्यानं लैंगिक सुख चांगलं देता-घेता येतं.

सक्रिय राहा
विविध कारणांनी जसे की मानसिक ताणतणाव, अधिक श्रमाची कामं केल्याने मानसिक व शारीरिक थकवा येतो नि शरीरसंबंध नकोसे वाटतात. ङ्गआज नको, उद्या बघूफ अशी मानसिकता होत जाते. अन् एका म्हणीनुसार तो उद्या कधीच येत नाही. म्हणजे आपण स्वतः हे सुख नाकारतो व जोडीदारास देखील त्यापासून वंचित करतो. पुढे या कारणांनी पती-पत्नीमध्ये बेबनाव होऊ शकतो. भांडणं लागू शकतात. त्यासाठी आपलं कामजीवन सक्रिय ठेवणं आपल्या हातात आहे. लहानसहान गोष्टींनी हे शक्य आहे. टी.व्ही. बघताना जोडीदाराचा हात हाती घेऊन बसणं, सुट्टीच्या दिवशी किंवा एरव्हीही घरात माणसं नसतील तर एकत्र आंघोळ करणं, मोबाईलवर लव्ह गेम्स खेळणं, आवडीचे खाद्यपदार्थ एकमेकांना खिलविणं आणि अलीकडे सहज उपलब्ध असलेले दर्जेदार पोर्नो क्लिप्स पाहणं. (मात्र या क्लिप्स्चा अतिरेक नको नि सवयही लावून घेता कामा नये.) अशा कृतींनी स्वतःची व जोडीदाराची देखील कामेच्छा सजग ठेवता येईल. लैंगिक सुख नकोसे वाटण्याऐवजी हवेसे वाटेल. अन् दोघांनाही आपण परफेक्ट पार्टनर असल्याचे समाधान लाभेल.

कल्पनाचित्रं रंगवा
हॉलिवूडच्या एका सुप्रसिद्ध सेक्सी नटीनं आयुष्यात खूप लैंगिक सुख घेतलं होतं. घेत होती. पामेला अ‍ॅन्डरसन् हे तिचं नाव. तिनं एकदा आपल्या सेक्शुअल फॅन्टॅसीज् जाहीर केल्या. अर्थात सेक्स सुखाबद्दलची आपली काही कल्पनाचित्रं रंगविली. ती म्हणाली, ङ्गङ्घमला लिफ्टमध्ये समागम करायचा आहे… मला कोवळ्या तरुणांशी सेक्स करायचा आहे… पार्श्‍वभागी सुख घ्यायचं आहे…फफ तिच्या हिशेबाने ही कल्पनाचित्रं धाडसी नसली तरी आपल्याला चकित करणारी आहेत. परंतु अशी कल्पनाचित्रं रंगविणं काही चूक नाही. उलटपक्षी अशा फॅन्टॅसीज् रंगविल्याने कामसुखाचं औत्सुक्य कायम राहतं. रंगत वाढीस लागते. अशा फॅन्टॅसीज् आपणही रंगविल्या तर काहीच हरकत नाहीत. स्वतः रंगवा नि जोडीदारासही विचारा की, तुझी वेगळी कामसुखाची कल्पना काय आहे? बाथटबमध्ये आंघोळ करण्याची इच्छा, गच्चीवर-घनदाट जंगलात, नदीकिनारी किंवा बोटीच्या डेकवर अथवा चांदण्या रात्रीच्या प्रकाशात माळरानावर अशा ठिकाणी कामसुख घेण्याची कल्पना रंगवा. ती जोडीदाराशी शेअर करा. त्यालाही विचारा. आता उपजत संकोची स्वभावानुसार पत्नी अशा इच्छा व्यक्त करू शकेल, असे वाटत नाही. तर तिला म्हणावं की, लिहून दे. मला आवडेल. या सर्व फॅन्टॅसीज् प्रत्यक्षात करता येतीलच असं नव्हे, पण कामजीवनाची रंगत मात्र वाढवतील.

साखरपेरणी करा
आपल्याकडे सर्वसाधारणपणे अशा आवडीनिवडी जाहीर न करण्याची पद्धत आहे. स्त्रियांचा तर तो निसर्गदत्त स्वभावच बनलेला आहे. रोज एकाच पद्धतीचं जेवण जिथे आपल्याला नको असतं, तिथे जीवनशैली तरी एकाच पद्धतीची कशी आवडेल? तीच गोष्ट कामसुखाच्या बाबतीत आहे. एकाच पद्धतीचं कामसुख उपभोगल्याने त्यात नीरसता येते. पुरुष आपल्या पद्धतीने वेगळेपणाने ते घेऊ इच्छितो. परंतु स्त्रियांच्या संकोची स्वभावामुळे त्या आपल्याला वेगळेपणाने हवे असलेल्या सुखाची मागणी करतीलच असं नाही. त्यांचा हा स्वभाव जाणून पतीने पत्नीला बोलतं करावं. ङ्गङ्घमी तुझ्याशी रत होताना बदल करतोय. तुला काही बदल हवे असले तर सांग ना ग राणी…फफ अशी साखरपेरणी करून पत्नीला बोलतं करावं. अन् आपण दोघंही परफेक्ट पार्टनर झाल्यास कामजीवनातील रंगत वाढेल, असा दिलासा द्यावा.

Share this article