Close

‘जुनं फर्निचर’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने केली धमाल; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ शोचा प्रोमो रिलीझ ( The entire team of ‘Juna Furniture’ Comes To Hastay Na Hasayalach Pahije Show Promo release )

“हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे!” असे म्हणत प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणारा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे त्याचा नवीन शो 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' कलर्स मराठीवर आपल्या रसिकांसाठी घेऊन आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या नव्या शोचे बरेच प्रोमोज, व्हिडिओज आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत होते. तेव्हापासूनच या शोची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये ओंकार भोजने व भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा' या चित्रपटाची संपूर्ण टीम खळखळून हसली.

नुकताच या शोचा दुसरा प्रोमो रिलीझ झाला असून या नवीन प्रोमोत निलेश साबळे व भाऊ कदम यांच्या विनोदावर महेश मांजरेकरांसह जुनं फर्निचर चित्रपटाची संपूर्ण टीम एन्जॅाय करताना दिसत आहे. इतकंच नाही तर, चित्रपटाच्या संपूर्ण टीमने चांगलीच धमाल, मजामस्ती केल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. निलेश साबळेंचे प्रश्न आणि रोहितच्या उत्तरांवर उपेंद्र लिमेय अन् सचिन खेडेकर लोटपोट हसत आहेत. त्यामुळे एकंदरीत या मंचावरती संपूर्ण टीम धमाल करणार असल्याचे दिसून येतेय.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’च्या या नवीन प्रोमोला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला. रसिकवर्ग आता पुढच्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहात आहेत. निलेश साबळेंचा नवीन शो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलेला दिसत आहे.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन डॉ. निलेश साबळे करत आहेत. तर भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम व रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे. कलर्स मराठीवर शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम पाहायला मिळणार

Share this article