Close

लहान मुलांना धाडस आणि जिद्दीचं बाळकडू देणाऱ्या ॲनिमेटेड ‘बुनी बियर्स’ चित्रपटाचे पोस्टर लॉंच! (The Poster Launch Of The Animated Movie ‘Bunny Bears’, Which Gives Courage And Stubbornness To Children!)

कोवळ्या वयात असणाऱ्या मुलांच्या अंगी चांगल्या संस्कारांची जर पेरणी झाली, तर मुलं मोठी होऊन नक्कीच चांगल्या वळणावर आयुष्य जगू शकतात. मुलांमध्ये संस्कारांची उत्तम पेरणी ही आई उत्तम करते असते, म्हणूनच जागतिक ‘मदर्स डे’चं निमित्त साधून ‘बुनी बियर्स’ या लोकप्रिय अॅनिमेटेड चित्रपटाच्या मालिकेचा पुढचा भाग ‘बुनी बियर्स गारडियन्स कोड’ हा १० मे २०२४ रोजी भारतभर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘बुनी बियर्स गारडियन्स कोड’ या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर लॉंच झाले असून सर्व सोशल मिडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपट इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये असणाऱ्या धमाल पात्रांना बघितल्यावर चित्रपटात धमाकेदार कथा असून धमाल मजा येणार असल्याचे दिसत आहे. चित्रपटाची कथा आणि यातील प्रसंग भारतातल्या चिमुलकल्यांसोबतच इतर सर्व रसिक प्रेक्षकांचं मन जिंकून घेणार असल्याचं दिसत आहे. अशा अनेक नवनवीन अॅनिमेटेड चित्रपटांमधून मनोरंजनासोबतच लहान मुलांना धाडस आणि जिद्दीचं बाळकडू देण्याचा प्रयत्न आहे.

Share this article