Close

साऊथ सुपरस्टार यशच्या वाढदिवसाचे कट आऊट्स लावताना तीन चाहत्यांचा मृत्यू (Three fans dies while putting up cutouts of South Superstar Yash’s birthday)

साऊथकडील सुपरस्टार यशचा वाढदिवशी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी करत असताना तीन चाहत्यांचा मृत्यू झाला आहे.

KGF फेम यशची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. त्यामुळे त्याचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या सोहळ्याप्रमाणेच असतो. आज यश आपला ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचे चाहते हे केवळ साऊथपुरतेच मर्यादित नसून बॉलिवूड प्रेक्षकांचाही त्यात समावेश आहे.

कर्नाटकातील गडग जिल्ह्यात एक अपघात झाला. यशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या फोटोचे कट आऊट लावत असताना विजेचा करंट लागून तिघांचा मृत्यू झाला.

तसेच आणखी तिघजण गंभीर जखमी झाले आहेत. यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. त्याने २००७ मध्‍ये जंबडा हुडुगी या चित्रपटातून पदार्पण केले.

पण KGF Chapter १ ने तो जगभरात प्रसिद्ध झाला. यानंतर जेव्हा याच सिनेमाच्या दुसऱ्या भागानेही तुफान लोकप्रियता मिळवली.

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Share this article