मराठी मनोरंजनसृष्टीत असे बरेच कलाकार मंडळी आहेत, जे आपली नोकरी सांभाळून अभिनयाची आवड जोपासत आहेत. तसेच अनेक कलाकारांनी विविध क्षेत्रात काम करून झाल्यानंतर अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. एवढंच नाही तर आज ही कलाकार मंडळी मराठी मनोरंजनसृष्टीत आघाडीवर आहेत. सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये ती पूर्णपणे वेगळी दिसत आहे.
ही मराठमोळी अभिनेत्री सध्या मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तसेच सध्या तिची मालिकाही चांगलीच गाजत आहे. या व्हायरल फोटोमधली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तितीक्षा तावडे आहे.
तितीक्षाने नुकताच तिचा हा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोवर तिनं “माझा एक जुना फोटो दाखवू” असं लिहीलं आहे. तितीक्षाचा हा पहिल्या नोकरीतला फोटो आहे. मॅकडोनाल्डमध्ये तितीक्षाने पहिली नोकरी केली होती, याची माहिती तिनं फोटो शेअर करत दिली आहे.
या फोटोवर बऱ्याच कलाकार मंडळींनी प्रतिक्रिया दिल्या आहे. तसेच तितीक्षाच्या चाहत्यांना हा फोटो पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका चाहत्यानं तिच्या फोटो खाली लिहीलं आहे की, ‘खरंच ही तू आहेस. अजिबात विश्वात बसतं नाहीये. किती बदल झाला आहे…पण गोड आहेस.’ तर दुसऱ्या चाहत्यानं लिहीलं आहे की, ‘गुब गुबी’. तसेच आणखी एका चाहत्यानं विचारलं आहे की, ‘तू हॉटेल मॅनेजमेंट केलं होतं का?’
दरम्यान, तितीक्षाच्या कामाबद्दल सांगायचं तर सध्या ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ती नेत्राच्या प्रमुख भूमिकेत दिसत आहे. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वीही तिताक्षा काही मालिका आणि चित्रपटात झळकली आहे. तसेच मराठीबरोबर तिनं हिंदीतही काम केलं आहे.