सई ताम्हणकरने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या सई ताम्हणकर आगामी नवीन वेब सीरिजमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. या सीरिजमध्ये सई गावरान लुकमध्ये दिसणार आहे. याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यावेळी अभिनेत्रीने खास फोटोशूट देखील केलं आहे. सईचा गावरान लूक पाहून चाहते देखील हैराण झाले आहेत.
याचबरोबर तिने इन्स्टाग्रामवर या वेब सीरिजचा ट्रेलर देखील शेअर केला आहे. हा ट्रेलर पाहून चाहत्यांच्या मनात देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. सईच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही चाहत्यांनी तिला कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करत आहे असा प्रश्न देखील विचारला आहे. त्यावर अभिनेत्रीने ट्रेलर पहा असं उत्तर दिलं आहे. सई ताम्हणकरची ही नवीन वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकताच 'मानवत मर्डर्स'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही सीरिज सर्वात भयानक ऐतिहासिक घटनेचा उलगडा करणार आहे. जिने 1972 ते 1974 पर्यंत देशाला हादरून टाकले. या सीरिजमध्ये भयावह घटनेचा उलगडा होणार आहे. ही क्राइम-थ्रिलर वेब सीरिज आहे. यामध्ये भारताचे शेरलॉक होम्स म्हणून ओळखले जाणारे सीआयडीमधील प्रतिष्ठित डिटेक्टिव्ह ऑफिसर रमाकांत एस. कुलकर्णी यांच्या नेतृत्त्वांतर्गत तपास पथक या खटल्याची तपासणी करताना पाहायला मिळेल.
तो या गुंतागूंतीच्या केसचा उलगडा करण्यासाठी आवश्यक असलेली अविरत कटिबद्धता, चिकाटी व कौशल्यांना दाखवताना तसेच 1970च्या दशकात ग्रामीण महाराष्ट्रातील गूढ हत्यांची मालिका सोडवण्याच्या आव्हानांचा सामना करताना पाहायला मिळणार आहे. या पाठलागा दरम्यान तो काळाच्या विरोधात जातो. त्यामुळे तो ही केस सोडवू शकेल का आणि वेळ निघून जाण्यापूर्वी पीडितांना न्याय मिळवून देईल का? हे 'मानवत मर्डर्स' या वेब सीरिजमधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
सत्य घटनेवर आधारित वेब सीरिज
सई ताम्हणकरच्या नवीन वेब सीरिजचं नाव 'मानवत मर्डर्स' आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी तसेच आशुतोष गोवारीकर इत्यादी कलाकार दिसणार आहेत. या वेब सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. सत्तरच्या दशकातल्या सत्य घटनेवर ही वेब सीरिज आधारित आहे. ही वेब सीरिज 4 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.