ॲनिमल या चित्रपटातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी 30 वर्षांची झाली आहे. अभिनेत्रीने तिचा वाढदिवस तिच्या कुटुंबियांसोबत साजरा केला. ज्याची काही झलक दाखवून अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना सोशल मीडियावरुन दाखवली आहे.
तृप्तीने तिचा 30 वा वाढदिवस तिच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसोबत साजरा केला.
तृप्तीने तिच्या इंस्टाग्रामवर या वाढदिवसाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये रुमची सुंदर सजावट स्पष्टपणे दिसत आहे,खोली पिवळ्या आणि पांढऱ्या फुग्यांनी सजवली आहे.
टेबलवर मुलांनी दिलेले फुलांचे गुच्छ आणि ग्रीटिंग कार्ड्स आहेत.
बेडशीटवर हॅपी बर्थडे लिहिलेले असते. भिंतीवर वाढदिवसाच्या शुभेच्छा असे बॅनरही आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये कुटुंबातील सदस्य केक कापतानाचे आणि केक खायला भरवतानाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
या सुंदर क्षणांमध्ये अभिनेत्री तिच्या प्रिय माणसांसोबत मस्ती करताना दिसत आहे.
वाढदिवसाचे हे सुंदर क्षण शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे - वाढदिवसाचे हे सेलिब्रेशन नेहमीच लक्षात राहील. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल धन्यवाद.
अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते आणि फॉलोअर्सही कमेंट करत आहेत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.;.,