टेलिव्हिजनवरील बिग बॉस हा कार्यक्रम जितका वादग्रस्त तितकाच लोकप्रिय देखील आहे. या कार्यक्रमात घडणाऱ्या वादविवादांबद्दल प्रेक्षकांनी कितीही टीका टीपण्णी केली तरी न चुकता ते हा शो बघतात. बिग बॉसच्या सध्या चालू असलेल्या १७ व्या पर्वामध्ये सुरुवातीपासूनच अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे जोडपे प्रबळ स्पर्धक म्हणून समोर आले. मात्र, दिवसेंदिवस त्यांच्यात मतभेद निर्माण होऊ लागले. आता हे मतभेद वाढता वाढता प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे.
अंकिता प्रेग्नंट असल्याची चर्चा त्यानंतर अंकिता व सुशांत राजपूत यांच्यातील नात्यामुळे अशी सुरुवातीपासूनच ती चर्चेत राहिली. अंकिताच्या वर्तणुकीमुळे अनेक प्रसंगी, चाहत्यांना असे वाटले की अंकिता लोखंडे लक्ष वेधण्यासाठी विकी जैनचा पाठलाग करत असते, परंतु तो आपल्या पत्नीपेक्षा खेळाला अधिक महत्त्व देतो. बिग बॉस १७ च्या घरात विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यातील भांडण इतके वाढले की त्यांच्या कुटुंबीयांना शोमध्ये यावे लागले. अंकिता आणि विकीच्या आईने या शोमध्ये सहभाग घेतला आणि दोघांनाही भांडण न करण्याचा सल्ला दिला.
अंकिता आणि विकी यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून त्यांच्या नात्यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. मात्र, पुन्हा एकदा दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि यावेळी अंकिताने घटस्फोटाची चर्चाही केली. या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना आयशा खान आणि विकी जैन बोलत असताना अंकिता संतापली.
या संवादादरम्यान विकी जैनने लग्नाची खिल्ली उडवली आणि सांगितले की, विवाहित पुरुष कधीच सांगू शकत नाही की त्याला किती वेदना होत आहेत. अंकिता लोखंडेला पतीची ही गोष्ट आवडली नाही. त्याचवेळी आयशा म्हणाली की तिला कधीच लग्न करायचे नाही आणि यामागे तिचे वडील आहेत.
अंकिता लोखंडेने नंतर विक्की जैनला विचारले की, तू लग्नाबद्दल असे का बोललास. यावर त्याने उत्तर दिले - "मला कसे वाटते हे मी कधीच सांगू शकत नाही. विवाहित लोक, विशेषत: पुरुष या गोष्टीतून जातात. ते कधीच सांगू शकत नाहीत की ते कोणत्या परिस्थितीतून जात आहेत आणि त्यांची समस्या काय आहे."
विकीचे बोलणे ऐकून अंकिता वैतागली. म्हणाली, "तुला एवढा त्रास होत असेल, तर तू माझ्यासोबत का आहेस? आपण घटस्फोट घेऊ, मला तुझ्यासोबत घरी जायचे नाही."
एवढेच नाही तर अंकिताने पुढे तिचा राग काढला आणि आयेशाला म्हणाली, "मला माहित आहे की विकी माझ्यावर प्रेम करतो, पण मला जे हवे आहे ते तो मला देऊ शकत नाही. कधीकधी मला असे वाटते की तो माझ्यावर नियंत्रण ठेवत आहे. तो वर्चस्व गाजवतो. माझ्या लक्षात आले आहे की जेव्हा-जेव्हा मी पुरुष स्पर्धकाशी भांडू लागते, तो मला थांबवतो.”
खरं तर 'बिग बॉस 17'मुळे अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचं वैयक्तिक आयुष्य सर्वांसमोर येत आहे. परंतु दोघांनी शो कडे गेमसारखे पाहून संयम ठेवला पाहिजे.