Close

… तर माझ्या मुलांनी पळून जाऊनच लग्न करावं, अंबानींच लग्न पाहून ट्विंकलने मांडलं मत ( Twinkle Khanna Statement On Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding)

काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्रीवेडिंग फंक्शन पार पडले. या सोहळ्याला जगभरातील दिग्गज व्यक्तींनी उपस्थिती लावलेली. हा दिमाखदार सोहळा अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सोहळ्याबाबत अभिनेत्री ट्विंकल खन्नाने नुकतेच आपलं मत व्यक्त केले.

टाइम्स ऑफ इंडिया दिलेल्या मुलाखतीत ट्विंकलने लिहिले की, मी माझ्या बहिणीला म्हणाले बरं झालं आपण आपली आडनावं बदलली नाहीत, लग्नानंतर आपण खन्नाच राहिलो. जर आपण आडनाव बदललं असतं तर पुन्हा खन्ना होण्यासाठी नवऱ्याकडून आपल्याला एनओसी घ्यावी लागली असती अंबानींच्या प्री-वेडिंग इव्हेंटनंतर, लेव्हल खूप वर सेट केली गेली आहे. अभिनेत्री म्हणाली की, मी नीता भाभींप्रमाणे नाचू शकत नाही.

ट्विंकलने पुढे लिहिले- 'जेव्हा मी महामारीच्या काळात तम्मा तम्मा या गाण्यावर नाचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी लगेच पडले, कदाचित देवालाही मी नाचायला नको होते. एवढेच नाही तर माझा पायही फ्रॅक्चर झाला. मी आणि माझा पती रात्री १० वाजेपर्यंत क्वचितच जागे राहतो. जेव्हा जेव्हा आम्हाला २० लोकांसाठी डिनर पार्टीचे आयोजन करावे लागते तेव्हा आम्ही खूप घाबरून जातो. जर माझ्या मुलांना खरोखर आनंदी व्हायचे असेल तर त्यांनी पळून जाऊन लग्न करणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे.

Share this article