बरेचदा सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत असणारी व्यक्ती खरी आहे की खोटी हे समजण्या अडथळे येतात. त्यामुळे लोकांची मोठी फसवणूक केली जाते. पैशांची अफरातफर होते. विशेषता फसवणारे लोक सेलिब्रेटींच्या नावाचा मोठ्याप्रमाणात वापर करुन त्यांच्या चाहत्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न करतात. नुकताच असा प्रकार प्रसिद्ध अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकरच्या बाबतीतही घडला आहे.
उर्मिलाने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन आपल्या नावाने लोकांना चुकीचे मेसेज करुन त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची बाब समोर आणली. एक स्क्रिनशॉट शेअर केला त्यात लिहिलेले की, “माझ्या चाहत्याचे खूप अभिनंदन. माझ्या गिवअवेमध्ये तुमची निवड झाली आहे. तुमच्या बक्षीसासाठी (UrmilaNimbalkar01) या टेलिग्रामवर मला मेसेज करा.” या स्क्रिनशॉटवर अभिनेत्रीने सावधानतेचा इशार देत लिहिले की, माझं कोणतंच टेलिग्राम चॅनेल नाही. त्याचप्रमाणे मी कोणतंही गिवअवे करत नाही आहे, अशा ऑफर्सला बळी पडू नका.”
उर्मिला निंबाळकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने दुहेरी, बनमस्का, दिया और बातमी हम यांसारख्या मालिकांमध्ये काम केले तर डम डम डिगा डिगा , एक तारा, अद्भूत यांसारख्या सिनेमा ती दिसलेली. याशिवाय ती सध्या भारतातली एक प्रसिद्ध युट्यूबर बनली आहे.