अभिनेता वरुण धवनच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे. तो बाबा होणार आहे. वरुण धवनची पत्नी नताशा दलाल प्रेग्नंट आहे. अभिनेत्याने तिच्या गरोदरपणाची घोषणा एका सुंदर फोटोसह केली आणि चाहत्यांसह चांगली बातमी शेअर केली. फोटोमध्ये वरुण धवन पत्नी नताशाच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे. या मोनोक्रोम फोटोवर चाहते खूप प्रेम करत आहेत.
वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या अभिनंदनासाठी सोशल मीडियावर कमेंटचा पूर आला आहे. भूमी पेडणेकर, नेहा धुपिया, इसाबेल कैफ, मौनी रॉय, करण जोहर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर आणि सोनम कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्याला या नवीन अध्यायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. वरुण धवनने इंस्टाग्रामवर नताशाच्या बेबी बंपला किस करतानाचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले - आम्ही प्रेग्नंट आहोत. फक्त तुमचे आशीर्वाद आणि प्रेम हवे आहे.
वरुण धवन आणि नताशा दलाल यांचा विवाह 24 जानेवारी 2021 रोजी झाला. तो आणि नताशा बालपणीचे मित्र आहेत आणि सहावी इयत्तेपासून ते एकत्र आहेत.