बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल सध्या त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्प्यातून जात आहेत. सध्या त्यांच्या घरात उत्सवाचे वातावरण आहे. नुकतीच त्यांच्या घरी एक छोटी परी आली आहे. 3 जून रोजी या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आणि आता बातमी अशी आहे की वडील होताच वरुण धवन त्याची पत्नी नताशा आणि लहान मुलीसह नवीन घरात शिफ्ट होणार आहे. अभिनेत्याने हृतिक रोशनचे अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे आणि लवकरच तो आपल्या कुटुंबासह नवीन घरात शिफ्ट होणार आहे.
वडील होताच वरुण धवन त्याची पत्नी नताशा आणि मुलीसह वेगळ्या घरात शिफ्ट होण्याचा विचार करत आहे आणि तो हृतिक रोशनच्या त्याच अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहे, जिथे हृतिक सध्या राहत आहे. एचटी रिपोर्टनुसार, वरुण धवनने मुंबईतील जुहू परिसरात समुद्र किनाऱ्यावर भाड्याने एक अपार्टमेंट घेतला आहे. सध्या हृतिक रोशन या अपार्टमेंटमध्ये राहत असून, तो लवकरच येथून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणार आहे.
वरुण धवन आपल्या कुटुंबासह जिथे शिफ्ट होणार आहे, त्याच बिल्डिंगमध्ये अक्षय कुमार आणि साजिद नाडियादवाला देखील राहतात. नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर वरुण धवन या सेलेब्सचा शेजारी होणार आहे. वरुण धवन अजूनही जुहूमधील एका अपार्टमेंटमध्ये राहतो, जो अभिनेताने 2017 मध्ये विकत घेतला होता.
वरुण धवनच्या लव्ह लाईफबद्दल सांगायचे तर, त्याने 2021 मध्ये त्याची मैत्रीण आणि फॅशन डिझायनर नताशा दलालशी लग्न केले. लग्नाआधी या जोडप्याने अनेक वर्षे एकमेकांना डेट केले होते आणि घरच्यांच्या संमतीने दोघांनी सात जन्माची शपथ घेतली होती. लग्नाच्या जवळपास तीन वर्षानंतर या दोघांनी 3 जून रोजी आपल्या पहिल्या मुलाचे या जगात स्वागत केले.
वरुण धवन सध्या त्याच्या आगामी 'बेबी जॉन' चित्रपटासाठी चर्चेत आहे. या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या ॲक्शन सिनेमात वरुण दमदार लूकमध्ये दिसणार आहे. याशिवाय वरुण धवन 'सिटाडेल इंडिया' मालिकेत समंथा रुथ प्रभूसोबत दिसणार आहे. इतकंच नाही तर अलीकडेच 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.