वरुण धवन आणि नताशा दलाल लवकरच आई-वडील होणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या ताज्या वृत्तानुसार, नताशाला प्रसूती वेदना सुरू झाल्या असून ती कधीही बाळाला जन्म देऊ शकते.
न्यूज 18 ला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह बातमीनुसार, आज म्हणजेच 3 जून रोजी अभिनेता वरुण धवनची पत्नी नताशा धवनला प्रसूती वेदना सुरू झाल्या आहेत. अभिनेता आज सकाळी मुंबईतील खार पश्चिम येथील हिंदुजा हॉस्पिटलबाहेर दिसला.
वरुणच्या हातात एक बॅग होती आणि तो बॅग घेऊन हॉस्पिटलमधून निघून आपल्या गाडीच्या दिशेने जात होता. त्याच्याकडे पाहून नताशा दलाल आपल्या पहिल्या बाळाला जन्म देण्यास तयार झाल्यासारखे वाटले.
याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात वरुणने सोशल मीडियावर पत्नी नताशा दलाल प्रेग्नंट असल्याची खुशखबर जाहीर केली होती. नताशाची प्रसूती याच आठवड्यात होणार होती, असेही सूत्रांनी सांगितले. मात्र आज सकाळीच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वरुणही तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होता. अभिनेत्याने त्याची सर्व कामे पुढे ढकलली आहेत.