अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन हे बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यापासून कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या दोघे देखील ‘बिग बॉस १७’ मध्ये दमदार स्पर्धक म्हणून सक्रिय आहेत. बिग बॉसमध्ये गेल्यापासून विकी आणि अंकिता यांचं खासगी आयुष्याचेही बारा वाजलेले आहेत. नॅशनल टीव्हीवर विकी जैन याने पत्नी अंकिता लोखंडे हिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. ज्याची चर्चा देखील सर्वत्र रंगली. सोशल मीडियावर दोघांचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. दोन स्पर्धकांमध्ये सूर जुळवणाऱ्या या शोने अंकिता आणि विकी यांचं नातं घटस्फोटापर्यंत न्यावं म्हणजे कमालच झाली म्हणायची!
बिग बॉसच्या सुरुवातीपासून ते अगदी काल परवापर्यंत अंकिताचा बॉयफ्रेंड सुशांत राजपूत ह्याचा इतक्यांदा उल्लेख झाला की लोकांनी त्यावरून अंकिताला झापायला सुरुवात केली होती. ते होत नाही तर आज काय नवीनच… विकी जैन देखील अंकिताशी लग्न करण्याआधी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या प्रेमात होता असं कळलं.
विकी आणि अंकिता यांच्या नात्याबद्दल अनेकांना माहिती आहे. पण अंकिता हिची आयुष्यात एन्ट्री होण्यापूर्वी विकी टीव्ही विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत होता. विकी याच्या पास्ट रिलेशनशिप बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. विकी जैन लग्नापूर्वी टीव्ही अभिनेत्री टिया बाजपेई हिला डेट करत होता. अनेक वर्ष टिया आणि विकी रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
विकी आणि अंकिता यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०२१ मध्ये विकी आणि अंकिता यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.