'सॅम बहादूर'च्या यशामुळे बॉलिवूड अभिनेता विकी कौशल चांगलाच चर्चेत आला आहे. या सिनेमानंतर संजय लीला भन्साळीचा बिग बजेट चित्रपट विकी कौशलच्या किटीमध्ये आला आहे. भन्साळीच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये विकी कौशल रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. भन्साळींच्या चित्रपटात विक्कीला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या सगळ्यामध्ये विकी कौशलच्या हाताला फ्रॅक्चर झालेले दिसले. विकीला बुधवारी संध्याकाळी त्याच्या घराबाहेर पापाराझींनी पाहिले होते, तेव्हा त्याच्या हातात प्लास्टर घातलेले होते.
विक्की कौशलचा लेटेस्ट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल भयानीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये विकी कौशल ग्रे टी-शर्ट आणि ग्रे शॉर्ट्स घालून कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. यादरम्यान अभिनेत्याच्या हातात प्लास्टर दिसत आहे. व्हिडिओमध्ये विकी कौशल देखील पापाराझींकडे हसताना दिसत आहे. मात्र अभिनेत्याला प्लास्टर घातलेल पाहून चाहते नाराज झाले आहेत. विकी कौशल लवकर बरा व्हावा यासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अलीकडेच संजय लीला भन्साळी यांनी विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबत लव्ह अँड वॉरची घोषणा केली आहे. लव्ह अँड वॉर व्यतिरिक्त विक्की कौशलने नुकतेच छावा या पीरियड ड्रामाचे शूटिंग पूर्ण केले आहे. छावामध्ये रश्मिका मंदान्ना विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. विकी कौशल शेवटचा मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादूर या चित्रपटात दिसला होता. सॅम बहादूरसाठी विकीला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला.