Close

भारताच्या एकता कपूर अन्‌ वीर दासने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार (Vir Das, Ekta Kapoor Won International Emmys 2023)

यंदाच्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय कलाकारांनी बाजी मारलेली आहे. प्रसिद्ध चित्रपट आणि मालिका निर्माती एकता कपूरला भारतीय टेलिव्हिजनमधील कारकिर्दीसाठी ५१ व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार मिळाला असून नेटफ्लिक्स निर्मित "वीर दास: लँडिंग" स्टँड अप कॉमेडीसाठी वीर दासला अन्‌ डेरी गर्ल्स सीझन ३ला एमी पुरस्कार विभागून देण्यात आलाय.

https://twitter.com/iemmys/status/1726789812940648613?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1726789812940648613%7Ctwgr%5Ed999dab766499bbd8e0dd5297c55043612cd7913%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmanoranjan%2Fvir-das-and-ekta-kapoor-wins-international-emmy-awards-2023-updates-drj96

वीर दासला सोशल मीडियावर चाहते आणि सेलेब्सकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. वीर दास त्याच्या युनिक कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहेत. आता त्यासाठी एमी पुरस्कार मिळणे ही मोठी बाब आहे. त्याने आपल्या कथेमध्ये, भारतीय आणि अमेरिकन संस्कृतींना राजकारणाच्या दृष्टीकोनातून पाहिलंय. भारतात जन्मलेला माणूस जो अमेरिकेत वाढला होता, वीरच्या दृष्टीकोनातून या दोन्ही संस्कृती शून्यात अस्तित्वात नाही. या दोन्ही संस्कृती असल्याच तर त्यांचा एकमेकांशी संबंध आहे, असा विचार त्याने यात मांडलेला आहे.

https://twitter.com/NewsArenaIndia/status/1726805574766277075?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1726805574766277075%7Ctwgr%5Ed999dab766499bbd8e0dd5297c55043612cd7913%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmanoranjan%2Fvir-das-and-ekta-kapoor-wins-international-emmy-awards-2023-updates-drj96

तर टेलिव्हिजन क्षेत्रातील यशस्वी योगदानाबद्दल एकता कपूरला एमी पुरस्कार मिळाला आहे. जेव्हा एकताला ऑगस्टमध्ये नामांकनाची बातमी मिळाली होती तेव्हा तिने शेअर केले होते, "एमी पुरस्काराचं माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे. हा पुरस्कार कामाच्या पलीकडे असलेल्या प्रवासाचे प्रतीक आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने जागतिक स्तरावर मी भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. टेलिव्हिजनमध्ये केलेल्या कामगिरीची जागतिक मंचावर दखल घेतली जात आहे."

१९९४ मध्ये एकता कपूरने बालाजी टेलिफिल्म्सची सुरुवात केली. भारतात सॅटेलाइट टीव्ही उद्योग सुरू झाल्यानंतर, एकताने तिच्या मालिकांद्वारे लाखो लोकांचे मनोरंजन केले. बालाजी बॅनरखाली तिने १७,००० तासांपेक्षा जास्त काळ चाललेले शो आणि सुमारे ४५ चित्रपटांची निर्मिती केली. याशिवाय तिने भारतातील पहिले ओटीटी प्लॅटफॉर्म एएलटी बालाजी लॉन्च केले. त्यामुळे पुरस्कार तो बनताही है, नाही का?

शेफाली शाह यांना देखील दिल्ली क्राईम या वेबसिरीजसाठी एमीमध्ये नामांकन मिळालं होतं. पण त्यांना पुरस्कारावर नाव कोरता आलं नाही.

Share this article