पोकेमॉन कंपनीने ‘पोकेमॉन हॉरिझॉन द सीरिज’ ही नवीन सीरिज हंगामावर २५ मे ला आणण्याची घोषणा केली आहे. यासंबंधी मुंबईतील जुहू येथील जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात ओरिजिनल ओपनिंग आणि एंडिंग साऊंडट्रॅकचे अनावरण करण्यात आले. प्रसिद्ध संगीतकार विशाल शेखर यांनी हे साऊंडट्रॅक तयार केले आहेत. अरमान मलिक आणि शिरले सेटिया यांचा आवाज आहे. यामुळे या शो ला स्थानिक फ्लेवर साज आला आहे.
या नवीन सीरिजमध्ये खिळवून ठेवणाऱ्या गोष्टीबरोबरच नवीन पात्रं घालण्यात आली आहेत. त्यात एअरशिपचं नेतृत्व करण्यासाठी कॅप्टन पिकाचूला पाचारण करण्यात आले आहे. पहिल्यांदाच भारतीय कलाकार आणि पोकेमॉन कंपनीने मिळून ही कलाकृती तयार केली आहे. ओपनिंग आणि क्लोझिंग ट्रॅकमुळे पोकेमॉन सीरिजला एक स्थानिक साज मिळाला आहे आणि ही विशेषत: भारतीय प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आली आहे. यामुळे या ब्रँडचा भारतात करमणूक श्रेत्रात पाय रोवण्याच्या तयारीचा प्रत्यय येतो. या चालींनी बालपण टिपलं आहे आणि त्यामुळे त्या अतिशय आनंददायी झाल्या आहेत.
पोकेमॉन कंपनीबरोबर केलेल्या या कामाबद्दल बोलताना विशाल आणि शेखर म्हणतात, “जेव्हा आम्हाला पोकेमॉन कंपनीकडून काम करण्यासाठी फोन आला तेव्हा आम्हाला अतिशय आनंद झाला. आम्ही ब्रँडची ओळख असलेल्या, त्यात भरपूर आनंद आणि अँडव्हेन्चर असलेल्या चाली रचल्या. आपल्या स्थानिक प्रेक्षकांना आवडावं यासाठी त्याला एक भारतीय चेहरा दिला. आम्हाला आशा आहे की जेव्हा लोक टीव्ही पासून दूर असतील तेव्हाही त्यांना या अॅनिमेटेड सीरिजची चाल आठवत राहील.”
अरमान मलिकही या कार्यक्रमाला उपस्थित होता. तो म्हणाला, “लहानपणी मी पोकेमॉन कार्ड्स खेळायचो. एक दिवशी याच सीरिजचं टायटल साँग हिंदी, तामिळ आणि तेलुगूमध्ये मला गायला मिळाले हे सगळं स्वप्नवत आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा पोकेमॉन पहाणे ही एक प्रथाच पडली होती. त्यामुळे हॉरिझॉन सीरिजसाठी त्याला आवाज देणे हा माझ्यासाठी फक्त सन्मानच नाही तर आयुष्याचं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे असं मला वाटतं. विशाल शेखरने पोकेमॉनचा जागतिक पातळीवर असलेला प्रभाव ओळखून काही पारंपरिक आवाजही त्यात घातले आहेत. ही चाल सगळ्या पिढ्यांना आपलीशी वाटेल अशी आहे. नाविन्य आणि नॉस्टॅलजिया यांचा संगम असलेल्या या सीरिजचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा याची मी आतुरतेने वाट पाहतो आहे.
शिरले सेटियानेही याप्रसंगी तिची प्रतिक्रिया व्यक्त केली. ती म्हणाली, “आपल्या बालपणाचा अविभाज्य भाग असलेल्या एखाद्या गोष्टीवर काम करणं हा सन्मानच आहे. पोकेमॉनचे सॉफ्ट टॉय आणि इतर वस्तू विकत घेणं मला आधीही आवडायचं आणि आताही आवडतं. या सीरिजसाठी गाणं हा माझ्यासाठी अतिशय अविश्वसनीय अनुभव होता. या चालीचा फॅन्सवर दीर्घकाळासाठी प्रभाव पडेल असं मला वाटतं.