कल्पक अभिव्यक्तीच्या नावाखाली अश्लीलता आणि लैंगिक साहित्याचा प्रचार करू नये, अशी भूमिका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली.
अश्लील, असभ्य आणि पोर्नोग्राफिक सदृश्य साहित्य प्रसारित केल्याबद्दल केंद्र सरकारने गुरुवारी १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. तसेच काही सोशल मीडिया अकाऊंटसही बंद केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, अश्लील साहित्य दाखिवणारे १८ ओटीटी प्लॅटफॉर्म, १९ संकेतस्थळ, १० ॲप्स (गुगल प्ले स्टोअरवरील सात आणि ॲपल स्टोअरवरील तीन) आणि ५७ सोशल मीडिया अकाऊंटला बंद करण्यात आलं आहे. आता देशभरात कुठेही या साईट्सना पाहता येणार नाही.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयानंतर सांगितले की, सर्जनशील अभिव्यक्तीच्या नावाखाली ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी अश्लील, असभ्य सामग्री दाखवली नाही पाहीजे. मंत्रालयाने सादर केलेल्या निवदेनात म्हटले की, माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या तरतुदीनुसार ही बंदी घालण्यात आली आहे. यासाठी इतर खात्याचे मंत्री आणि सरकारच्या विभागांचे मत जाणून घेण्यात आले. तसेच माध्यम आणि करमणूक क्षेत्र, महिला आणि बाल अधिकारासाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांचीही मते जाणून घेण्यात आली.
खालील ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी
ड्रिम्स फिल्म्स (Dreams Films)
वुव्ही (Voovi)
येस्समा (Yessma)
अनकट अड्डा (Uncut Adda)
ट्री फ्लिक्स (Tri Flicks)
एक्स प्राइम (X Prime)
निऑन एक्स व्हिआयपी (Neon X VIP)
बेशरम्स (Besharams)
हंटर्स (Hunters)
रॅबिट (Rabbit)
एक्स्ट्रामुड (Xtramood)
न्यूफ्लिक्स (Nuefliks)
मूडएक्स (MoodX)
मोजफ्लिक्स (Mojflix)
हॉट शॉट्स व्हिआयपी (Hot Shots VIP)
फुगी (Fugi)
चिकुफ्लिक्स (Chikooflix)
प्राइम प्ले (Prime Play)