Close

वेब सिरीज “किलर सूप” वादाच्या भोवऱ्यात : ‘किलर’ जीन्सच्या उत्पादकांचा ट्रेड मार्क उल्लंघन केल्याचा दावा ( Web Series ” Killer Soup” In Trouble : Suit Filed Against The Series For Infringement Of ‘ Killer’ Trademark)

'नेटफ्लिक्स' वर दाखवली जाणारी "किलर सूप" ही वेब सिरिज आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 'किलर जीन्स' च्या उत्पादक कम्पनीने सदर मालिका व तिच्या निर्मात्यांविरुद्ध हायकोर्टात दावा दाखल केला आहे. 'किलर' या ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याबद्दल केवल किरण क्लोथिंग लिमिटेड कम्पनीने हा दावा 'किलर सूप' मालिकेविरुद्ध केला आहे.

"किलर सूप" मालिकेत मनोज बाजपेयी व कोकणा सेन शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'किलर'  हा आपल्या कम्पनीचा ट्रेडमार्क असून त्याचा मालिकेच्या नावाचा भाग म्हणून वापर करण्याबाबत उत्पादकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मालिकेचे प्रक्षेपण करणारी नेटफ्लिक्स व निर्माता मेकगफिन पिक्चर्स यांना सदर दाव्यात प्रतिवादी करण्यात आले आहे.

Share this article