वेब सिरीज 'यलोस्टोन 1923' फेम अभिनेता कोल ब्रिंग्स प्लेंटीचे शनिवार, ६ एप्रिल रोजी निधन झाले. तो गूढ मृतावस्थेत सापडला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. तसेच तो घरगुती हिंसाचार प्रकरणात संशयित होता. पोलिस जंगलात एका लावारिस गाडीची माहिती मिळताच तिथे तपास करण्यास गेले होते तेव्हा त्यांना अभिनेत्याचा मृतदेह आढळून आला.
कॅन्सस पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांना गेल्या आठवड्यात म्हणजेच एप्रिलच्या सुरुवातीला एका अपार्टमेंटमधून एक महिला मदतीसाठी ओरडत असल्याची तक्रार मिळाली होती. तेव्हापासून पोलीस अभिनेत्याला अटक करण्यासाठी त्याचा शोध घेत होते. पोलिस जेव्हा महिलेपर्यंत पोहोचले तेव्हा संशयित तिथून पळून गेला होता.
पोलिसांनी असेही सांगितले की, त्या घटनेनंतर शहरातून बाहेर पडणाऱ्या ट्रॅफिक कॅमेऱ्यांवर प्लेंटी दिसला. अपार्टमेंटमधील घटनेनंतर अभिनेत्याच्या अटकेसाठी जिल्हा वकिलांकडे प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात आलेले. त्याला संशयित म्हणून पकडण्यासाठी आणि त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडे अनेक कारणे होती. एवढेच नाही तर त्याच्याविरोधात एजन्सींनी अलर्टही जारी केला होता.
अभिनेता मोझेस ब्रिंग्स प्लेंटी यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या पुतण्याच्या मृत्यूची बातमी शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, 'आमचा मुलगा कोल सापडला पण तो आता आमच्यात नाही हे सांगयला मला खूप वाईट वाटत आहे. कोलसाठी तुमच्या प्रार्थना आणि सकारात्मक विचारांसाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. या कठीण काळात आम्हाला गोपनीयता हवी आहे. कोलच्या काकांनी यापूर्वी आपल्या पुतण्याच्या बेपत्ता झाल्याची अनेक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केल्या होत्या. अभिनेत्याने आपला फोन बंद केला आणि त्याचा कोणताही पत्ता लागत नव्हता, तेव्हा त्याच्या कुटुंबाने हरवल्याची तक्रार दाखल केली होती.