स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत सुरु आहे नयना आणि अद्वैतच्या लग्नाची धामधूम. लग्न जरी नयना आणि अद्वैतचं होणार असलं तरी योगायोगाने कला आणि अद्वैतला आयुष्यभरासाठी एकत्र आणणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत.
साखरपुड्याची अंगठी अद्वैतकडून नयनाऐवजी कलाच्या बोटात घातली गेली. लग्नाची उष्टी हळदही नयनाऐवजी कलाला लागली. नियतीच्या मनातही अद्वैत आणि कलाने एकत्र यावं ही एकच इच्छा आहे. साखरपुडा, हळद आणि संगीत तर पार पडलंय. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती लग्नाची. नयना आणि अद्वैतच्या लग्नासाठी मंडप सजलाय. वऱ्हाडीही जमलेत. त्यामुळे अद्वैतच्या घरात लक्ष्मीच्या पाऊलांनी कोण जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.
Link Copied