Close

अभिनय सोडण्याचा विचार करत होता अभिषेक बच्चन, बिग बींचा एक सल्ला अन् केला फेरविचार (When Abhishek Bachchan Wanted To Quit Acting, Know How Amitabh Bachchan Convinced Him )

आगामी 'बी हॅपी' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, अभिषेक बच्चनने खुलासा केला की त्याच्या अभिनय कारकिर्दीत एक वेळ अशी आली होती जेव्हा तो अभिनय सोडू इच्छित होता, तेव्हा त्याचे वडील आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी त्याला समजावून सांगितले आणि पुन्हा अभिनय करण्यास राजी केले.

बॉलिवूडचा ज्युनियर बच्चन सध्या त्याच्या 'बी हॅपी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या ज्युनियर बच्चनने मुलाखतीदरम्यान तो काळ आठवला जेव्हा त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि त्याला अभिनय सोडावा का असा विचार करावा लागला होता.

कंटेंट क्रिएटर आणि पत्रकार नयनदीप रक्षित यांच्या यूट्यूब चॅनलवर दिसलेल्या अभिषेक बच्चनने त्याची कधीही न ऐकलेली कहाणी सांगितली. ज्युनियर बच्चन म्हणाला- मला अजूनही आठवते जेव्हा मी एका रात्री माझ्या वडिलांकडे गेलो आणि म्हटले की मी चूक केली आहे. मी खूप प्रयत्न करतोय पण त्याला यश येत नाहीये. मला वाटतं हे काम माझ्यासाठी नाहीये.

माझे वडील आणि इंडस्ट्रीचे सुपरस्टार अमिताभ बच्चन म्हणाले - मी हे वडील म्हणून नाही तर एक अभिनेता म्हणून सांगत आहे की तुला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तू अजून तयार उत्पादनाच्या जवळपासही पोहोचलेला नाही. पण प्रत्येक चित्रपटाबरोबर तू अधिक चांगला होत चालला आहेस. फक्त तुझं काम करत राहा. एक दिवस तू नक्कीच तिथे पोहचशील.

त्यांचे बोलणे ऐकून मी खोलीबाहेर जात असताना ते मागून म्हणाले - मी तुला आयुष्यात हार मानायला शिकवले नाही. म्हणून लढत राहा. हे माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे.

Share this article