श्वेता तिवारी तिचा अभिनय आणि फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर हॉट फोटो पोस्ट करुन श्वेता बऱ्याचदा चर्चेत राहते. या वयातही तिचा फिटनेस चर्चेचा विषय असतो.
श्वेता तिवारीला छोट्या पडद्याची क्वीन म्हटलं जातं. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेमुळे ती घरा-घरात पोहोचली. श्वेता तिवारीची लोकप्रियता आजही तितकीच कायम आहे. 'कसौटी जिंदगी की' मध्ये श्वेता तिवारी आणि सीजेन खानची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. दोघे खऱ्याखुऱ्या आयुष्यातही खूप जवळ आले होते. श्वेता तिवारी त्यावेळी विवाहित होती.
23 वर्षापूर्वी छोट्या पडद्यावर 'कसौटी जिंदगी की' सीरियल हिट ठरलेली. या मालिकेतील अनुराग बसू (सीजेन खान) आणि प्रेरणा (श्वेता तिवारी) चा रोल प्रचंड हिट झालेला. खऱ्याखुऱ्या आयुष्यातही दोघांची जोडी शोभून दिसेल असं चाहत्यांच म्हणण होतं.
पण मतभेदांमुळे दोघांमधील नातं संपलं. त्यानंतर सीजेन आणि श्वेता फक्त आपल्या कामापुरती बोलायचे. नेमकं त्यांच्यात कशावरुन बिनसलं, ते समजू शकलं नाही. इंडिया फोरम्सशी बोलताना सीजेन खान म्हणाला की, 'मी म्हणीन की, श्वेता तिवारी माझी पहिली आणि शेवटची चूक होती'
"आता मला तिच्याशी काही देणघेणं नाही. ती माझ्यासाठी काही नाहीय. माझ्यासाठी तिचं महत्त्व नाहीय. मी भविष्यात कोणाच्या इतक्या जवळ जाऊ शकणार नाही" असं सीजेन खान म्हणाला.
सीजेननुसार, एकवेळ त्यांच्यामध्ये मैत्री पलीकडच नातं होतं. पण आता त्यांना एकमेकांशी देणघेणंसुद्धा नाहीय. त्यांचे मार्ग वेगळे झालेत.