देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोनासप्रमाणेच तिची मुलगी मालती मेरी जोनास देखील सोशल मीडिया स्टार बनली आहे. प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास दररोज मुलगी मालती मेरी जोनासचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियावर पुन्हा एकदा आई आणि मुलीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
ग्लोबल स्टार बनलेली प्रियांका चोप्रा आणि तिची मुलगी मालती मेरी लॉस एंजेलिसमध्ये सनी डे एन्जॉय करताना दिसल्या.
दोघी मायलेकी मित्रांना भेटायला बाहेर पडलेल्या. या ताज्या फोटोंमध्ये मालती मेरी जोनासचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियांका चोप्राने मालतीला कुशीत घेतले आहे. दोघेही आउटिंग दरम्यान त्यांच्या चाहत्यांशी भेटताना आणि बोलतांना दिसत आहेत.
काही फोटोंमध्ये ती इतर मुलांसोबत संवाद साधताना दिसत आहे. प्रियांका आपल्या मुलीसोबत एक दिवसाच्या सहलीचा आनंद घेत असताना खूप खूश दिसत आहे फोटोमध्ये प्रियांकादेखील गोड दिसत आहे.
ही छायाचित्रे पाहून चाहते मालतीचा चेहरा तिची आई प्रियांका चोप्रासारखा दिसतो असा अंदाज बांधत आहे., तर काही चाहत्यांना असे वाटते की मालती तिचे वडील निक जोनास सारखी आहे.
अभिनेत्रीने शर्ट आणि गडद रंगाची कार्गो पॅन्ट, पांढरा टँक टॉप घातला आहे. अभिनेत्रीने कॅप आणि सनग्लासेस देखील घातले आहेत. मालती मेरीने रंगीबेरंगी डोंगरी असलेली मॅचिंग कॅप घातली आहे.
आई आणि मुलीच्या या फोटोंवर चाहते कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणी म्हणतंय की प्रियांका नेहमी आपल्या मुलीसोबत राहते. कुणी मालती तिच्या आईसारखी दिसते, तर कुणी तिच्या वडिलांसारखी दिसते, असे लिहिले आहे.