Close

कोण होते मलायकाचे वडील अनिल अरोरा? घ्या जाणून ( Who Is Malaika Arora Father Anil Arora Know More Information )

बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री तसेच मॉडेल मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या वांद्रे येथील घरातून तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं.

मलाइका अरोराचे वडील अनिल अरोरा हे भारतीय सैन्याचे माजी अधिकारी होते. मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांचे कुटुंब भारताच्या सीमेवर वसलेल्या फाजिल्का येथे राहायचे. अनिल अरोरा यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये काम केले होते.

मलायका अरोरा जेव्हा फक्त ११  वर्षांची होती तेव्हापासूनच तिचे आई-वडील एकमेकांपासून वेगळे राहत होते. त्यांनी एकेमेकांसोबत घटस्फोट घेतला होता. मलायकानेही तिच्या आई-वडिलांच्या विभक्त होण्याचे दु:ख देखील एका मुलाखतीत शेअर केले होते.

अभिनेत्रीने तिच्या एका जुन्या मुलाखतीत म्हटले होते – मी जेव्हा 11 वर्षांची होते तेव्हा माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झालेला. पण त्याचवेळी मला माझ्या आईला नवीन दृष्टीकोनातून पाहण्याचा मार्ग मिळाला. मलायका म्हणाली की तिने आयुष्यात तिच्या आईला खूप काम करताना पाहिले आहे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी सर्व काही विसरून सकाळी कसे उठायचे हे त्यांच्याकडूनच ती शिकल्याचे ती मुलाखतीत म्हणाली होती.

अनिल अरोरा आणि त्यांची पत्नी जॉयस पॉलीकार्प विभक्त झाले असले तरी, दोघेही कौटुंबिक प्रसंगी आणि सण-उत्सवांना मुलांसोबत साजरे करायचे.

Share this article