देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी नुकतेच वाराणसीमध्ये त्यांची धाकटी मुलगी दिविशाची मुंडण केली आणि तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. आणि आता अभिनेत्रीने तिची मोठी मुलगी लियानाचे सुद्धा मुंडण करून घेतले आहे, पण तिचे मुंडण घरीच करण्यात आलो होते, वाराणसीतच दोघांचे मुंडण का झाले नाही असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
देबिनाने मुंडन समारंभाचा संपूर्ण व्हिडिओ यूट्यूब व्लॉगवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये लिआना मुंडनच्या वेळी खूप रडत असल्याचे दिसून येते. वाराणसीमध्ये धाकट्या मुलीसह मोठ्या मुलीचे मुंडण का करण्यात आले नाही, हेही या अभिनेत्रीने स्पष्ट केले. देबिनाने सांगितले की, वाराणसीमध्ये दोघांची मुंडण करण्याचा, प्लॅन होता, पण त्यावेळी लियाना खूप आजारी पडली होती. तिला औषध देऊन बरे करण्याचा प्रयत्नही करण्यात आला, परंतु ती लवकर बरी होऊ शकली नाही आणि त्यामुळेच त्यावेळी तिचे मुंडण करण्यात आले नाही.
अभिनेत्रीने सांगितले की लियानाचे मुंडन आता घरी केले गेले आहे आणि ती तिचे केस वाराणसीला घेऊन गंगेत विसर्जित करणार आहे. तसेच ती लियानासोबत वाराणसीच्या सहलीचाही प्लॅन करत आहे जेणेकरून तिला तेथील चव आणि विशेषतः दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल.
देबिनाने तिच्या दोन्ही मुलींचे मुंडन केल्यानंतरचे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात दोघांचे चेहरा नाही, पाठ दिसत आहे, डोक्यावर केस नाहीत. यासोबतच तिने चाहत्यांना कोण लियाना आणि कोण दिविशा याचा अंदाज लावायला सांगितले आहे. हा फोटो खरोखरच गोंडस आहे.