Close

‘सॅम बहादूर’ साठी विकी कौशलचीच निवड का ? अभिनेत्यानेच सांगितले खरे कारण (Why Vicky Kaushal was chosen for ‘Sam Bahadur’? The actor himself told the real reason)

विकी कौशल त्याच्या आगामी 'सॅम बहादूर' या चित्रपटात फील्ड मार्शल सॅम माणेकशॉची भूमिका साकारत आहे. मेघना गुलजारच्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. विकीच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.

सॅम माणेकशॉची भूमिका साकारण्यासाठी विकी कौशलने खूप मेहनत घेतली. ट्रेलरमध्ये विकी त्यांच्यासारखाच दिसत आहे. विकीला ही भूमिका त्याच्या नाकामुळे मिळाली हे फार कमी लोकांना माहीत असेल. याचा खुलासा खुद्द विक्की कौशलने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

त्याने सांगितले की त्याच्या लांब नाकामुळे त्याला हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. सॅम माणेकशॉ यांचेही नाक लांब होते. या खास कारणास्तव हा चित्रपट विकी कौशलच्या पदरी पडला. चित्रपटात विकी कौशलवर प्रोस्थेटिक मेकअपचाही वापर करण्यात आलेला नाही. सॅम माणेकशॉची व्यक्तिरेखा आणखी चांगली करण्यासाठी विकीने त्यांची बोलण्याची, चालण्याची आणि उभी राहण्याची शैली उत्तम प्रकारे कॉपी केली आहे. या भूमिकेत स्वत:ला सामावून घेण्यासाठी विकीने खूप मेहनत घेतली आणि त्याची मेहनत आता फळाला आली आहे. त्याचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो.

हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक आणि झीशान अय्युब यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Share this article