Close

महिलांचे आर्थिक भान : ६३% महिलांना उद्योजक बनण्याची आकांक्षा; ७२% महिलांचा रोख रक्कम काढण्याकडे कल (Women Financial Index: 63%Women Aspire To Start Their Own business; 72% Avail Cash Withdrawal Services)

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे आर्थिक भान काय आहे, यासंबंधी आकडेवारी समोर आली आहे. ६३% महिलांना उद्योजक बनण्याची आकांक्षा आहे, तर ७२% महिलांचा रोख रक्कम काढण्याचा नि त्याचा विनियोग करण्याकडे कल आहे. पेनियरबाय या ब्रँचलेस बँकिंग व डिजिटल नेटवर्क यांच्या विमेन फायनान्शिअल इंडेक्स सर्वेक्षणातून जी माहिती बाहेर आली आहे, त्यातील हे ठळक मुद्दे आहेत. कंपनीने स्त्रियांच्या ५००० रिटेल दालनातील आर्थिक व्यवहारांचे निरीक्षण करून हा अहवाल दिला आहे.

सदर अहवालातील अन्य काही मुद्दे असे आहेत –

  • ७०% स्त्रियांकडे जन-धन बचत खाते असून त्यांचा वापर प्रामुख्याने रोख पैसे काढण्यासाठी केला जातो.
  • ईएमआय पेमेंट्‌स ५०० ते १००० रुपयांदरम्यानची असतात.
  • २७% स्त्रियांनी दीर्घकाळ बचतीसाठी १५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम बचत करण्याकडे पसंती असल्याचे सांगितले.
  • ४५% स्त्रियांनी सरकारी योजनांचा लाभ घेतल्याचे सांगितले.
  • १८ ते ३० वयोगटातील स्त्रिया डिजिटल प्रणाली वापरतात.
  • ४५% स्त्रिया स्मार्टफोन व व्हॉटस्‌ ॲपचा वापर करतात.

“ई-कॉमर्स, म्युच्युअल फंड, निश्चित ठेवी अशा नव्या सेवांचा वाढता वापर, ग्रामीण भागातील आश्वासक ट्रेंड दर्शविणारा आहे. स्त्रियांना त्यांची बचत, गुंतवणूक आणि इतर महत्त्वाच्या बाबींवर नियंत्रण मिळवून देण्यासाठी सक्षम करण्याचे ध्येय ठेवले आहे. सशक्त नारी, सशक्त देश,” असे पेनियरबायचे संस्थापक आणि संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कुमार यांनी सांगितले.

Share this article