येऊ कशी कशी मी नांदायला फेम स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर सध्या खूप चर्चेत आहे. अभिनेत्री सध्या शिक्षणासाठी ऑस्ट्रलियात वास्तव्यास असते. परदेशात शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसाच अन्विताला सुद्धा करावा लागला. याबद्दल तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
पोस्टमध्ये तिने लिहिले की, " हिटर - एअरकॉन डिव्हाईस बिघडल्याने आम्हाला गेल्या अनेक दिवसांपासून त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्याबद्दल आम्ही गेल्या चार महिन्यांपासून ई-मेल करत आहोत. एवढा त्रास होऊ नये आणि दर महिन्याला भाडे भरतो. यावर ना उपाय ना आम्हाला आर्थिक भरपाई दिली जात आहे.
या संपूर्ण परिस्थितीचा आमच्या राहणीमानावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. जगभर लोकप्रिय असलेल्या अशा संस्थेकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी जे सेमिस्टर साठी ऑस्ट्रेलियाला येत असतील त्यांनी कृपया युनिलॉजला निवडू नका, कारण ते तुमचा महत्त्वाचा वेळ वाया घालवतील.
अन्विताची ही पोस्ट चर्चेत असतो. त्यावर अनेकजण चिंता व्यक्त करत आहेत. अन्विताने आता येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेशिवाय टाइमपास या सिनेमात सुद्धा काम केले होते.