हल्ली सगळेच फिट राहण्यासाठी काही न काही व्यायाम करून फिट राहण्याचा प्रयत्न करत असतात अश्यातच अभिनेत्री अमृता खानविलकर देखील अगदी न चुकता रोज योगा करून फिट राहते. तिच्या फॅशन सोबत फिटनेसच्या चर्चा कायम होताना दिसतात. शूट आणि व्यायाम यांचा योग्य समतोल साधत अमृता रोज योगा करते आणि फिट राहते.
योगा दिनानिमित्ताने अमृताने सोशल मीडिया वर काही खास योगा व्हिडिओ शेयर करून सगळ्यांना फिट राहण्याची प्रेरणा दिली आहे. योगा हा तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे हे कायम तिच्या सोशल मीडिया वरून कळत. यंदाच्या योगा निमित्ताने अमृताने तिच्या व्हिडिओ मधून खास संदेश दिला आहे.
अमृता म्हणते "योगा करण हा माझ्या जगण्याचा एक भाग झाला आहे. शूट मधून कायम वेळ काढून मी योगा करतेय. जेव्हा आपण योगा करतो तेव्हा ब्रिदिंग हे नीट जमलं पाहिजे तुम्हाला आसन नाही आली तरी चालेल पण तुम्हाला व्यवस्थित ब्रिदिंग जमलं पाहिजे. रोजच्या जीवनात रोज न चुकता योगा करण हा टास्क असला तरी त्यातलं सातत्य जपून कायम व्यायाम केला पाहिजे"
अमृता तिच्या शूट मधून देखील वेळ काढून सातत्य जपत योगा करते आणि यातून फिट राहते. प्रत्येक माणूस हा फिट राहण्यासाठी व्यायाम करतोच पण एक कलाकार म्हणून कामासोबत व्यायाम करण्याकडे देखील तिचा कल हा असतोच. जागतिक योगा दिनी अमृताने अनेकांना पुन्हा एकदा योगा करण्यासाठी प्रेरणा दिली आहे आणि योगाच महत्त्व समजावून सांगितलं आहे.
कामाच्या आघाडीवर अमृता सध्या " ड्रामा ज्युनियर" शो साठी जज बनली आहे सोबतीला 36 डे मधून लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षभरात ती अनेक हिंदी मराठी प्रोजेक्ट्स मधून काम करताना दिसणार आहे. कलावती, ललिता बाबर, पठ्ठे बापूराव अश्या अनेक चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारणार आहे. वर्षभरात अमृता प्रेक्षकांचं मनोरंजन करणार यात शंका नाही.