Close

डोळे हे… (Your Beautiful eyes)

नयनांच्या हालचालींवरून आपल्याला स्त्रीचं लाजणं, हसणं, रुसणं, रागावणं, करारी असणं, हे सगळं स्पष्टपणे जाणवतं. व्यक्तीनुरुप डोळ्यांची ठेवण वेगळी आहे, त्यांचं सौंदर्य जपल्यास अशा नयनांवरून नजर हटवणं केवळ अशक्य!

डोळे हे आपल्यासाठी देवाचं वरदान आहेत. डोळ्यांमुळे आपण विश्‍वातील सौंदर्य पाहू शकतो. असे हे डोळे बोलतातही. मनातील भाव कधी कधी ओठांवर येण्याआधीच डोळ्यांतून व्यक्त होतात. एवढंच नव्हे तर, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा आपल्या डोळ्यांत उमटत असतो. नयनांच्या हालचालींवरून आपल्याला स्त्रीचं लाजणं, हसणं, रुसणं, रागावणं, करारी असणं, हे सगळं स्पष्टपणे जाणवतं. व्यक्तीनुरुप डोळ्यांची ठेवण वेगळी आहे, त्यांचं सौंदर्य जपल्यास त्यांच्यावरून नजर हटवणं केवळ अशक्य!

इंद्रधनूशी

डोळ्यांना बहुरुपदर्शक भासवायचं असल्यास, वेगवेगळ्या रंगाच्या आयशॅडोज वापरता येतात. यामुळे डोळ्यांचं सौंदर्य एवढं उठून दिसतं की, एखाद वेळेस ओठांना लिपस्टिक लावली नाही, तरी तिकडे कोणाचं लक्ष जात नाही.

Beautiful eyes

अ‍ॅक्वा मॅजिक

डोळ्यांना निळ्या रंगांच्या शेड्स द्या. त्यासाठी निळ्या रंगाचं काजळ किंवा आय शॅडो वापरा आणि डोळ्यांखाली ते अधोरेखित करा. शांत पाण्याकडे पाहिल्यावर त्यात बुडी मारण्याची इच्छा व्हावी, त्याप्रमाणे अशा डोळ्यांमध्ये बुडून जावंसं वाटल्याशिवाय राहणार नाही. डोळेच एवढे रेखीव असतील की, चेहर्‍यास फार मेकअप करण्याची गरजच नाही.

चारकोल

बुबुळांचा रंग सौम्य असेल, तर ती उठून दिसण्यासाठी त्यांस गडद मेकअप करा. कोळश्याप्रमाणे धूसर रंगाचा, अर्थात स्मोकी आय शॅडोचा वापर करा. डोळ्यांचा हा लूक संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी एकदम फिट आहे.

ग्लिटर

मेकअपच्या बाबतीत नवखे असाल, तर आकर्षक डोळ्यांसाठी ग्लिटर्सचा वापर जरूर करून पाहा. संपूर्ण पापण्यांवर ग्लिटर पसरवा किंवा ग्लिटरचा एक ठिपका डोळ्यांना लावा. डोळ्यांची ही चमक कुणाच्याही नजरेतून सुटणार नाही, हे नक्की.

Beautiful eyes

मिड नाइट चार्म

निळ्या अन् काळ्या रंगाच्या छटा आणि त्यात भर म्हणून सोनेरी रंगाचा स्पर्श डोळ्यांना मादक लूक देतो. रात्रीच्या किर्र शांततेत डोळ्यांचं हे सौंदर्य घायाळ केल्याशिवाय राहत नाही.

कॅट वुमन

कॅट आइज किंवा आकाराने लहान असलेल्या डोळ्यांना रेट्रो किंवा फ्लरटेयशस इफेक्ट द्या. तो तुम्हाला नक्कीच शोभून दिसेल. आणि त्यात तुम्ही लिटील ब्लॅक ड्रेस किंवा फ्युजन आऊटफिट घातला असेल, तर असा आय मेकअप तुम्हाला अगदी क्लासी लूक देईल.

Share this article