Close

२५ वर्ष दमदार, सेलिब्रेशन जोरदार ! झी मराठी अवॉर्ड २०२४ च्या नामांकन पार्टीमध्ये कलाकारांचा कल्ला ( zee marathi nomination party and 25 years celebration)

२५ वर्ष दमदार, सेलिब्रेशन जोरदार !
पंचविसावं वर्ष आहे , सेलिब्रेशन मोठ्ठ आहे..
झी मराठी अवॉर्ड २०२४ च्या नामांकन पार्टीमध्ये कलाकारांचा कल्ला
कलाकारांच्या मांदियाळीत रंगली झी मराठी अवॉर्ड २०२४ ची नामांकन पार्टी

नुकतंच झी मराठीने ‘ झी मराठी अवॉर्ड २०२४’ नामांकन पार्टी चं आयोजन केलं होतं. वेषभूषेसाठी यावेळची थीम होती Glittering Orange . सर्व कलाकारांनी पार्टीच्या थीमचे अनुसरण केले आणि त्यांच्या उत्कृष्ट केशरी पोशाखात तयार होऊन ते हजर झाले होते. झी मराठीसाठी आणि कलाकारांसाठी हे डबल सेलिब्रशन होतं कारण एक तर झी मराठी अवॉर्ड्स २०२४ ची नामांकन पार्टी आणि दुसरं म्हणजे झी मराठीचं पंचविसावं महोत्सवी वर्ष. या निमित्ताने झी मराठीचं संपूर्ण कुटुंब एकत्र एका छताखाली आलं, आजपर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि एकमेकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी. जे कलाकार झी कुटुंबात १९९९ पासून सामील आहेत त्यांनी ही आपल्या लाडक्या वाहिनीच्या या पंचविसाव्या वर्षाच्या महोत्सवात हजेरीलावली.

जसजशी एका एका मालिकेची नामांकनं जाहीर होत होती, तसतशी कलाकारांची उत्कंठा अधिकच वाढत होती. प्रत्येकजण फक्त आपल्या मालिकेच्या कलाकारांनाच नाही तर दुसऱ्या कलाकारांच्या मालिकेलाही तेवढच समर्थन करताना दिसले. नामांकन जाहीर झाल्यावर स्टेजवर आणखीन एक कार्यक्रम रंगला.

सध्या चर्चेत असलेला क्रेटेक्स, जगप्रसिद्ध डीजे आणि संगीत निर्माता तो ही 'झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ नामांकन पार्टी मध्ये सहभागी झाला आणि आपल्या सुप्रसिद्ध गाणं 'तांबडी चामडी' वर सगळ्या कलाकारांना थिरकवले . कलाकारांनी केशरी रंगाच्या पेहेरावातून रेड कार्पेटवर चारचाँद लावले. उत्तोरोत्तर रंगत गेलेल्या या धमाल नामांकन सोहळ्यानंतर आता उत्कंठा लागली आहे ती 'झी मराठी अवॉर्ड्स २०२४' च्या भव्य सोहळ्याची.

प्रेक्षकांना हे सर्व लवकरच बघायला मिळणार आहे पण कधी हे जाणून घेण्यासाठी बघत राहा आपली लाडकी झी मराठी वाहिनी

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/