Close

झीनत अमान यांचा इंस्टाग्राममधून ब्रेक (Zeenat Aman Distanced Herself From Social Media)

झीनत अमान यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक लांबलचक नोट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी त्या अचानकपणे कोणत्याही नियोजनाशिवाय इंस्टाग्राममधून ब्रेक घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याचे कारण देत झीनत यांनी लिहिले की, त्या त्यांच्या अकाऊंटवर स्वतःचा फोटो पाहून कंटाळल्या आहेत. त्यांनी पुढे लिहिलं- जेव्हा मी करिअर सुरू केलं तेव्हापासून आजचं जग किती वेगळं आहे. ७०च्या दशकात आणि आजच्या काळात मी जे पाहिले त्यात बरेच बदल झाले आहेत.

झीनत यांनी लिहिले- आज इंटरनेट आणि विशेषतः सोशल मीडियाने समाजासाठी काय केले आहे, याचा विचार करून मला आश्चर्य वाटते. अर्थात त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. काही प्रमाणात, सोशल मीडियाने प्रसिद्धीच्या मार्गाचे लोकशाहीकरण केले आहे. आज काही हुशार लोक स्मार्टफोनच्या मदतीने सोशल मीडियावर आपले करिअर करू शकतात. होय, काही ऑनलाइन केवळ गर्दीला खूश करणारे आहेत, परंतु तेथे प्रामाणिक प्रतिभावान लोक देखील आहेत, ज्यांना आता एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे.

झीनत यांनी ट्रोलिंग आणि त्याला सामोरे जाण्याचे मार्गही सांगितले. त्यांनी लिहिले- मी ऑनलाइन ट्रोलिंगबाबत खूप सावध आहे. काही लोक ऑनलाइन उलट-सुलट गोष्टी कशा बोलतात, ज्या त्या कधीही तोंडावर बोलण्याची हिंमत करू शकत नाहीत.

माझ्या मते, हे एका कंटाळवाण्या समाजाकडे निर्देश करते, जो विसरला आहे की या जगातील प्रत्येक माणूस खूप लहान आहे! माझ्या मते, प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी लोकांना दोष देणे, त्यांना कमी लेखणे आणि त्यांची बदनामी करणे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते, लोकांनी हे मान्य केले पाहिजे.

झीनत यांनी पोस्टसह एक फोटो देखील शेअर केला आहे ज्यामध्ये त्या मिंट ग्रीन पोशाख परिधान केलेल्या दिसत आहेत. त्यांनी सांगितले की, हा फोटो त्यांचा मुलगा जहां खानच्या कारच्या खिडकीतून काढण्यात आला आहे.

झीनत अनेकदा त्यांच्या पोस्ट्समुळे चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. सायरा बानो, मुमताज आणि मुकेश खन्ना यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यावर टीका केली. सोनी राजदान यांच्यासह अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला.

Share this article