Close

झीनत अमान यांनी त्यांच्या बायोपिकसाठी घेतलं ‘या’ अभिनेत्रीचं नाव! (Zeenat Aman Koffee With Karan 8)

कॉफी विथ करण हा टेलिव्हिजनवरील शो अतिशय लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामध्ये जुने नवे असे सर्वच कलाकार कशाचीही भीड न बाळगता सत्य वदताना दिसतात. ‘कॉफी विथ करण ८’च्या आताच्या अगदी नव्या एपिसोडमध्ये अभिनेत्री झीनत अमान आणि नीतू कपूर हजेरी लावणार आहेत. आपल्या दमदार अभिनयाने आणि नितळ सौंदर्याने बॉलिवूड विश्वाचा एक काळ गाजवणाऱ्या या दोन्ही अभिनेत्री आता ‘कॉफी विथ करण’च्या ८व्या सीझनमध्ये हजेरी लावून पुन्हा एकदा आपला जलवा दाखवणार आहेत. हातात कॉफीचा वाफाळता कप घेऊन या दोघीही करण जोहरच्या शोमध्ये आपल्या मनातील भावना आणि आठवणी सांगताना दिसणार आहेत.

या कार्यक्रमामध्ये झीनत अमान यांनी आपल्या बायोपिक विषयी देखील मोठा खुलासा केला आहे. प्रश्न उत्तरांच्या ओघात करण जोहर याने झीनत अमान यांना त्यांच्या आयकॉनिक चित्रपटाबद्दल म्हणजेच ‘सत्यम शिवम सुंदर’ या चित्रपटाबद्दल प्रश्न केला. यासोबतच करणने झीनत अमान यांच्या बायोपिकचा विषय देखील काढला. या दोन्ही प्रश्नांना झीनत अमान यांनी धडकेबाज उत्तर दिली. रॅपिड फायर राउंडमध्ये करण जोहर याने झीनत अमान यांना काही प्रश्न विचारले. यात त्याने विचारलं की, जर ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटाचा दुसरा भाग काढायचा झाल्यास, आजच्या काळातील कोणती अभिनेत्री ‘रूपा’ची भूमिका साकारू शकते?

करण जोहरच्या या प्रश्नाचं उत्तर देताना झीनत अमान यांनी क्षणाचाही विलंब न लावता अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचं नाव घेतलं. यानंतर करण जोहरने प्रश्न केला की, तुमचा बायोपिक बनवला गेला तर, कोणती अभिनेत्री तुमची भूमिका सक्षमपणे साकारू शकते, असं तुम्हाला वाटतं? यावर उत्तर देताना झीनत अमान यांनी ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचं नाव घेतलं. अभिनेत्री प्रियांका चोप्रामध्ये आपल्याला आपली प्रतिमा दिसते, असं झीनत अमान म्हणाल्या. मनोरंजन विश्वात १९७०चं दशक गाजवणाऱ्या झीनत अमान आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. ‘हरे रामा हरे कृष्णा’ सारख्या चित्रपटातून त्यांनी मनोरंजन विश्व गाजवलं आहे. या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला. यानंतर, त्यांनी ‘डॉन’, ‘धर्मवीर’, ‘कुर्बानी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’ सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले. आजही त्यांच्या अभिनयाची जादू मनोरंजन विश्वात पाहायला मिळते.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/