Close

मुलीसारखा नाचतो म्हणून लोकांनी सतत मारलेले टोमणे, आता बॉलिवुमधील सेलिब्रिटींनाही नाचवतोय तालावर ( Ashish Patil struggle to Bollywood Choreographer story)

सध्याच्या काळात आशिष पाटील हा लावणी किंग म्हणून ओळखला जातो. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला चंद्रमुखी या सिनेमातील बाई ग आणि चंद्रा या दोन्ही गाण्यांची कोरिओग्राफी आशिषने केलेली. या दोन्ही गाण्यांमधील डान्सचे प्रेक्षकांकडून भरपूर कौतुक झाले. विशेष म्हणजे आशिषच्या कामाची दखल बॉलिवूडमध्ये घेतली गेली.

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी आशिषला त्यांच्या आगामी हिरामंडी या सिनेमा कोरिओग्राफी करण्याची संधी दिली. त्यामुळे आशिष ने बॉलिवूड कलाकारांनाही आपल्या तालावर नाचवले आहे. सध्या आशिष कडे नावलौकिक सगळं असलं तरी त्याचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोप्पा नव्हता. पुरुष असून लावणी करतो म्हणून त्याला बरेचदा लोकांनी हिणवले. अगदी नाचा देखील म्हटले. आपण सहन केलेल्या त्रासाबद्दल आशिषने नुकतेच सेलिब्रिटी कट्टाला दिलेल्या मुलाखती सांगितले.

आशिष म्हणाला की त्याला लहानपण मित्र-मैत्रिणी फारसे नव्हते. हा मुलींसारखा वागतो बोलतो असे बरेच जण म्हणायचे. अनेकांनी मला नाच्या असं टोपण नावही ठेवल.

Share this article