Close

भरघोस यश मिळूनही या गोष्टीला घाबरते अनुपमा फेम रुपाली गांगुली (‘I Go To Work Everyday With Guilt’, Says Anupamaa Aka Rupali Ganguly)

हिंदी टेलिव्हिजनमध्ये सध्या अनुपमा ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल आहे. अभिनेत्री रुपाली गांगुलीला लोक आता अनुपमा नावाने ओळखू लागले आहेत. लोकांना ती साकारत असलेली भूमिका खूप आवडते.

पण इतकं होऊनही रुपालीला प्रचंड गिल्टनं जगावं लागतं. रुपालीने एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत या गिल्टबद्दल सांगितले.

अभिनेत्रीने सांगितले की, मालिकेच्या यशानंतरही तिला दुःख सतावत आहे. रुपालीने सांगितले की, ती रोजच्या रोज अपराधी भावनेने कामावर जाते. तिला सतत वाटते की ती आपल्या मुलाला जास्त वेळ देऊ शकत नाही.

रुपाली म्हणाली की माझ्या आयुष्यातली समस्या म्हणजे मी माझ्या मुलाला जास्त वेळ देऊ शकत नाही आणि त्यामुळेच मी अपराधी भावनेने रोज कामावर जाते. पण मी नशीबवान आहे की मला एक चांगला जीवनसाथी मिळाला आहे जो खूप समजूतदार आहे. लोकांची विचारसरणी देखील बदलली आहे की स्त्रीने घरातच राहून मुलांची काळजी घेतली पाहिजे असे नाही. तो स्वतः माझ्या घरी राहतो. महिलांनाही त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा अधिकार आहे हे त्याने सिद्ध केले आहे. आईने घरीच राहावे आणि नवऱ्याने बाहेर जाऊन स्वप्ने पूर्ण करावीत असे काही नसते.

मी बाहेर जाऊन काम करावे ही माझ्या नवऱ्याची सक्ती नाही पण मी माझ्या प्रतिभेचा आदर करावा अशी त्यांची इच्छा आहे. माझ्यात प्रतिभा असेल तर ती प्रेक्षकांसमोर यायला हवी असे त्यांना वाटते.

Share this article