श्रीदेवी-बोनी कपूरची लाडकी जान्हवी कपूर अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहारिया याला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. जान्हवी कपूरलाही शिखरसोबत मंदिरांमध्ये अनेकदा पाहिलं गेलं आहे, पण दोघांनीही त्यांच्या नात्याची आजपर्यंत पुष्टी केलेली नाही किंवा त्यांनी या बातम्यांवर कधीही प्रतिक्रिया दिली नाही. पण गेल्या काही काळापासून जान्हवी कपूर काहीतरी करत आहे, ज्यामुळे ती शिखर पहाडियासोबतच्या डेटिंगच्या अफवांना अप्रत्यक्षपणे पुष्टी देत असल्याचं दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी जेव्हा जान्हवी मैदान चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचली होती, तेव्हा तिने तिच्या गळ्यात प्रियकर शिखूच्या नावाचे लॉकेट घातले होते. काल पुन्हा एकदा ती तिच्या गळ्यात तिच्या प्रियाकराचे नाव परिधान करून एका कार्यक्रमात पोहचली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जान्हवी कपूर ब्लॅक अँड व्हाइट मिनी ड्रेस परिधान करून एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. ज्वेल नेकलाइनसह स्टायलिश स्लीव्ह्ज परिधान करून, ती नेहमीप्रमाणेच जबरदस्त दिसत होती. पण सर्वांच्या नजरा तिच्या गळ्यात खिळल्या होत्या, ज्यावर तिचा अफवा असलेला प्रियकर शिखर पहाडिया, शिकू असे टोपणनाव लिहिले होते. आता जान्हवीने 'कॉफी विथ करण'मध्ये याआधीच खुलासा केला आहे की ती शिखर पहाडियाला शिकू म्हणते.
आता चाहत्यांचे म्हणणे आहे की जान्हवी हे उघडपणे बोलणार नाही पण प्रियकराच्या नावाचे पेंडेंट घालून तिने तिचे नाते पक्के केले आहे आणि एक प्रकारे खुलेपणाने आपले प्रेम व्यक्त केले आहे. जान्हवीला तिच्या बॉयफ्रेंडचे नाव घेताना दिसण्याची ही दुसरी वेळ आहे.
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री आगामी काळात अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यामध्ये ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटाच्या नावाचा समावेश आहे. याशिवाय जान्हवी कपूर राम चरणच्या 'आरसी 16' या चित्रपटातही दिसणार आहे.