Close

ओरहान नाही तर हा आहे अजय देवगणची मुलगी नीसा देवगणचा बॉयफ्रेंड(Kajol and Ajay Devgn’s daughter Nysa is Dating This Person, Know Who is Her Alleged Boyfriend)

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची लाडकी मुलगी नीसा देवगण ही अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नीसा अनेकदा तिच्या सार्वजनिक कार्यक्रमांमुळे आणि मित्रांसोबतच्या पार्ट्यांमुळे चर्चेत असते. नीसा अनेकदा तिचा जिवलग मित्र ओरहान अवत्रामणीसोबत पार्टी करताना दिसली आहे, पण जर तुम्हाला असे वाटत असेल की ती त्याला डेट करत आहे, तर थांबा कारण नीसा ज्या व्यक्तीला डेट करत आहे तो ओरहान नसून दुसराच कोणतरी आहे. चला जाणून घेऊया कोण आहे काजोल आणि अजय देवगणची मुलगी नीसा यांचा कथित बॉयफ्रेंड?

20 वर्षांच्या नीसाने सिंगापूरमधील युनायटेड कॉलेज ऑफ साउथ ईस्ट एशियामध्ये शिक्षण घेतले आहे. आता ती स्वित्झर्लंडमधील ग्लिओन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये पुढील शिक्षण घेत आहे. नीसा इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचा कोर्स करत आहे, चाहते देखील नीसाच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

ओरीबरोबरच्या पार्ट्यांमध्ये अनेकदा दिसलेली नीसा वेदांत महाजनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. नीसाच्या पार्टीचे फोटो पाहिले असतील, तर ओरहान व्यतिरिक्त, ती वेदांत महाजनसोबत दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नीसा वेदांतला डेट करत आहे, तो एक उद्योजक आहे.

नीसाचा कथित प्रियकर वेदांत एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा सह-मालक आहे. तो मुंबई, दिल्ली आणि लंडनमध्ये मेगा पार्ट्या आयोजित करतो. एका न्यूज पोर्टलच्या रिपोर्टनुसार, वेदांतने लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून उद्योजकतेमध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे. रणवीर सिंग, कनिका कपूर यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या कंपनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये परफॉर्म केले आहे.

आपल्या ग्लॅमरस लुकमुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या नीसाबाबत अजय देवगणने एका मुलाखतीत सांगितले होते की, या गोष्टी त्याला खूप त्रास देतात, कारण तुम्ही ते बदलू शकत नाही. मुलीला ट्रोल केल्याबद्दल अजय म्हणाला होता की, अनेकदा काय करावे हे समजत नाही, कारण बहुतेक वेळा अशा गोष्टी लिहिल्या जातात ज्या खऱ्या नसतात, परंतु त्यावर प्रतिक्रिया दिल्यावर त्या अनेक पटींनी वाढतात.

अजय देवगण आणि काजोल हे इंडस्ट्रीचे मोठे स्टार आहेत, त्यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. अजय देवगणला मुलगी नीसाच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, नीसाचा सध्या चित्रपटात येण्याचा कोणताही विचार नाही, ती सध्या हॉस्पिटॅलिटी शिकत आहे.

Share this article