Close

करिना आणि सैफच्या लग्नाला झाली ११ वर्ष, अभिनेत्रीने मजेशीर अंदाजात केले नवऱ्याला विश…(Kareena Kapoor’s Share Post For Saif Ali Khan On Their 11th Wedding Anniversary)

करीना आणि सैफची जोडी एकदम परफेक्ट आहे. एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर दोघांनी २०१२ साली लग्न केले. आज १६ ऑक्टोबर रोजी ते आपल्या लग्नाचा अकरावा वाढदिवस साजरा करत आहेत.

यानिमित्ताने करिनाने सोशल मीडियावर काही मनोरंजक आणि सुंदर फोटो पोस्ट केले आहेत आणि पती सैफला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करिनाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती पिझ्झा खाताना दिसत आहे आणि सैफ तिच्या खांद्यावर हात ठेवून हसत हसत तिच्याकडे इशारा करत आहे.

करिनाने एक अतिशय मनोरंजक कॅप्शनही लिहिले आहे.- हे आपण, तू, मी आणि पिझ्झा… कायमचे प्रेम… नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

त्यांचे सेलिब्रिटी मित्र त्यांना शुभेच्छा देत आहेत. मलायका, संजय आणि महीप कपूरपासून ते सैफची बहीण सबा यांनीही दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

याशिवाय चाहत्यांनाही ही पोस्ट खूप आवडली असून ते या जोडप्याला बेस्ट कपल आणि क्यूट कपल म्हणत शुभेच्छा देत आहेत.

Share this article