Close

१ मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘नाच गं घुमा’ला तुफान प्रतिसाद!, तब्बल २० हजार तिकिटांचे बुकिंग!१ मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘नाच गं घुमा’ला तुफान प्रतिसाद! ( Nach G Ghuma Movie Gets Bumper Advance Booking On Box Office)

बुकींगचा विक्रम नोंदविला आहे. या चित्रपटाच्या तिकिटांचे आणि शोंचे हे आरक्षण ‘बुक माय शो’वर आरक्षण सुरु होण्याआधीच नोंदविले गेले आहे, हे विशेष. मुंबई, पुणे, ठाणे, नवीन मुंबईसह नाशिक, नागपूर, पिंपरी चिंचवड या केंद्रांवरही चित्रपटाच्या बुकिंगला तुफान प्रतिसाद मिळत आहे. महिला प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ असून त्यांच्या अनेक ग्रुपनी चित्रपटाचे संपूर्ण शो आरक्षित केले आहेत. अनेक महिलांनी तो आपल्या मोलकरणींबरोबर पाहण्याचे जाहीर केले आहे. कथा-पटकथेचे वेगळेपण, दमदार अभिनय आणि आपल्या दैनंदिन जीवनातील कथा यांमुळे रसिकांची उत्कंठा ताणली गेली असून, चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची प्रतीक्षा लागली आहे.

मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी यांनी चित्रपटाचे लेखन केले असून त्यांच्यासह शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील आणि स्वप्नील जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. कामगार दिनी १ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘नाच गं घुमा’चे टप्प्याटप्प्याने आलेले टीझर, ट्रेलर आणि गाणी यांनी विविध माध्यमांवर उदंड प्रतिसाद मिळवला आहे.

महिलाप्रधान ‘नाच गं घुमा’ मध्ये मुक्ता आणि नम्रता यांच्याबरोबर सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि बालकलाकार मायरा वायकूळ यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ‘पॅनोरमा स्टुडीओज’ने स्वीकारली आहे.

पिंपरी चिंचवड येथील - 'आपला आवाज-आपली सखी' हा६० हजार सदस्यसंख्या असलेला महिलांचा ग्रुप मराठी चित्रपटांचे बुकिंग त्यांच्या सदस्यांसाठी करतो. ‘नाच गं घुमा’चे ४० शो त्यांनी बुक केले आहेत. त्याविषयी बोत्लाना या ग्रुपच्या संयोजिका संगीता तरडे म्हणाल्या, “मकर संक्रातीच्या मुहूर्तावर परेश मोकाशी यांनी या चित्रपटाची घोषणा केली तेव्हापासून चित्रपटाविषयी आम्हाला मोठी उत्सुकता होती. आम्ही चित्रपटाचे ४० शो बुक केले आहेत. प्रत्येक स्त्रीच्या मनातील काहीतरी स्वप्ने ही संसार, मूल, कुटुंबाची काळजी घेण्याच्या नादात राहून जातात. तिला समाज सांगत असतो की, 'नाच गं घुमा' पण ती म्हणत असते की 'कशी मी नाचू?' या दुष्टचक्रात सगळ्या बायका अडकलेल्या असतात. महिलांची स्वप्नपूर्ती करण्याचे काम आमचा ग्रुप करतोय. या चित्रपटातूनही तोच संदेश संदेश दिला जात आहे.”

श्रीमती तरडे पुढे म्हणतात, "‘नाच गं घुमा’मध्ये स्वतःचे करिअर सांभाळून संसार करणारी स्त्री आणि मदत करणारी कामवाली बाई यांची धम्माल गोष्ट पाहायला मिळणार आहे. कामवाली बाई हीदेखील एक माणूस आहे, तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा अशी अपेक्षा आहे, तो या चित्रपटामुळे नक्कीच बदलेल. मालकीण आणि कामवाली बाई यांचे एक वेगळे विश्व असते. त्यांच्यात भांडणे, वाद, आनंद, सुख-दु:ख असे सर्व काही घडत असते. हे नाते प्रेक्षकांसमोर ‘नाच गं घुमा’ यामधून पहायला मिळणार आहे."

जिजा स्टुडिओच्या संचालिका शीतल सूर्यवंशी यांनी म्हटले की, “आम्ही आमच्या जिजा लेडीज ग्रुपमढील महिलांसाठी जेव्हा चित्रपटगृहात बुकिंगसाठी गेलो तेव्हा स्क्रीन उपलब्ध नाही, असा अनुभव आला. पहिल्यांदाच असे घडत होते आणि आमच्या ग्रुपच्या महिलांना सध्या प्रतीक्षा करावी लागत आहे. १ मे रोजी महाराष्ट्रात फक्त ‘नाच गं घुमा’ची चर्चा असणार आहे आणि तो प्रेक्षकांच्या मनात घर करणार आहे. संपूर्ण पुण्यात जवळपास १०० हूनही अधिक स्क्रीन बुक झाल्या असून आम्हाला नवीन स्क्रीन मिळणे अवघड झाले आहे.”

मोलकरीण-गृहिणी यांचे नाते, त्याचे विविध पैलू, मोलकरणीवाचून ओढवणारे धर्मसंकट व तिची आपल्या आयुष्यातील अनिवार्यता, असा हा सगळा मामला अगदी वेगळ्या व मनोरंजक पद्धतीने ‘नाच गं घुमा’मध्ये साकारला गेला आहे.

Share this article