दुबईहून मुंबईत परतलेल्या राखी सावंतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता एक आवाहन केलं आहे. ती म्हणाली की, सलमान खान कोहिनूर हिऱ्यापेक्षा खास आहे. त्यामुळे त्याची सुरक्षा वाढवली पाहिजे.
पत्रकार परिषदेत राखी सावंत म्हणाली, 'जेव्हा मला गोळीबार झाल्याचं समजलं तेव्हा मी खूप रडले. मी दुबईत होते. कोहिनूर हिऱ्यापेक्षा सलमान खान आपल्या देशासाठी महत्त्वाचा आहे. आम्हाला सुरक्षित राहण्यासाठी सलमान खान हवा आहे. मोदीजी, तुम्ही विनाकारण कंगना राणौतला इतकी सुरक्षा दिली आहे.
राखी सावंतने सलमान खानच्या सुरक्षेवर भाष्य करत म्हटले की, 'तोही गरिबांचा कैवारी आहे. हात जोडून मी सलमान खानला सांगेन की त्याने कधीही बाल्कनीत येऊ नये. आमच्या सारख्या चाहत्यांसाठी ते एक मोठे हॉटेल बुक करून तिथे येऊ शकतात आणि आमच्या सारख्या चाहत्यांना भेटू शकतात. जिथे सुरक्षा देखील असेल.
राखी पुढे म्हणाली, 'सलमान खान सुरक्षित असावा अशी आमची इच्छा आहे. मोदीजी, कृपया सलमान खानला झेड, बी, एक्स क्लास अशा सर्व स्तराची सुरक्षा द्या. तुम्ही कोणतेही कारण नसताना कंगनाला इतकी सुरक्षा दिली. तर मला वाटते की सलमान खानला अधिक सुरक्षा दिली पाहिजे. तो आपला बॉलीवूडचा दिग्गज आहे.