देसी गर्ल प्रियांका चोप्रा आज तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रियांका सध्या लंडनमध्ये आहे पण तिला भारतातूनही वाढदिवसाच्या खास शुभेच्छा मिळत आहेत. वाढदिवसानिमित्त अनेक जण शुभेच्छा देत असले तरी तिची धाकटी बहीण परिणीती चोप्राने एक खास फोटो शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
परिणीतीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, हा फोटो परिणीतीच्या एंगेजमेंटच्या वेळचा आहे. या फोटोत परिणीती बसलेली आहे आणि प्रियांका तिच्यासोबत उभी आहे आणि प्रियांका आपल्या बहिणीची कपाळावरील बिंदी नीट करत आहे.
परिणीतीने क्रीम कलरचा पोशाख घातला आहे आणि प्रियांकाने फ्लोरोसेंट हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. परिणीती तिच्या बहिणीकडे प्रेमाने पाहत आहे.
परीने फोटोवर लिहिले आहे – हॅपी बर्थडे मिमी दीदी… धन्यवाद तू माझ्यासाठी जे काही करते त्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे… याच्या पुढे, परीने हार्टचा एक इमोजी देखील पोस्ट केला आहे.
प्रियांका परिणीतीच्या एंगेजमेंटसाठी खास भारतात आली होती. राघव चढ्ढा आणि परिणीती यांच्या एंगेजमेंटला उपस्थित राहून ती लगेच परतली.
पीसीच्या वाढदिवसानिमित्त निक जोनास लंडनमध्ये एक भव्य पार्टी देणार असल्याचे बोलले जात आहे.