Close

रॅडिश मॅडीश (Radish-Madish)

साहित्य : स्टफिंग तयार करण्यासाठी : १ कप मुळा (किसलेला), १ टेबलस्पून तेल, प्रत्येकी १-१ टीस्पून हिरव्या मिरचीची पावडर आणि चिंचेचा कोळ, प्रत्येकी अर्धा-अर्धा टीस्पून लाल तिखट, गरम मसाला पावडर आणि हळद, चवीनुसार मीठ आणि साखर, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, १ टेबलस्पून कोथिंबीर (बारीक चिरलेली)

कव्हर तयार करण्यासाठी : १ वाटी बटाटा (उकडलेला आणि स्मॅश केलेला), अर्धा-अर्धा कप कॉर्नफ्लोअर आणि ब्रेडचा चुरा, २ टेबलस्पून कोथिंबीर (बारीक चिरलेली), मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल.

कृती - स्टफिंगसाठी - कढईत तेल गरम करा, त्यात हिरवी मिरची पेस्ट आणि मुळा घाला आणि त्यात सर्व पावडर, साले, चिंचेचा कोळ, साखर आणि कोथिंबीर घालून २-३ मिनिटे परतून घ्या. त्यात तांदळाचं पीठ घालून चांगले मिसळा. झाकण ठेवून २-३ मिनिटे राहू द्या. आचेवरून खाली घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवा.

कव्हरसाठी - तळण्यासाठी तेल वगळता, उरलेले सर्व साहित्य मिसळा. थोडेसे मिश्रण हातावर पसरवून त्यात सारणाचं साहित्य भरा आणि व्यवस्थित बंद करा. कढईत तेल गरम करा नि तयार केलेले बॉल्स सोनेरी रंगावर तळा. शेजवान चटणीसोबत सर्व्ह करा.

Share this article