अरुण गोविल यांनी टीव्हीवरील प्रसिद्ध पौराणिक मालिका 'रामायण'मध्ये भगवान श्रीराम यांची भूमिका साकारून प्रत्येक घराघरात ओळख निर्माण केली. लोक खरोखरंच त्यांची प्रभू रामाप्रमाणे पूजा करू लागले. 1987 मध्ये अरुण गोविल यांनी रामानंद सागर यांच्या रामायणातील रामाची व्यक्तिरेखा अशा प्रकारे जगली की लोक त्यांना खऱ्या आयुष्यातही भगवान राम मानू लागले. आजही लोक त्यांना त्यांच्या खऱ्या नावापेक्षा प्रभू राम म्हणून ओळखतात. राम बनून प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या अरुण यांना खरे तर खूप साधे जीवन जगणे आवडते. अरुण गोविल यांच्याकडे किती मालमत्ता आहे हे आम्ही या लेखात सांगू.
अरुण गोविल यांचा जन्म 12 जानेवारी 1958 रोजी मेरठ येथे झाला. त्यांनी चौधरी चरण सिंग विद्यापीठातून बीएससीचे शिक्षण घेतले आहे. अरुण गोविल यांनी सरकारी अधिकारी व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, पण त्यांच्या नशिबात वेगळंच काही लिहिलं होतं, असं म्हणतात.
असं म्हणतात की, शिक्षण पूर्ण केल्यानंतर अरुण गोविल आपल्या भावाच्या व्यवसायात सामील होण्यासाठी मुंबईत आले, पण त्यानंतर व्यवसायाऐवजी त्यांच्यात फिल्मी दुनियेतली आवड जागृत होऊ लागली, मग काय, त्यांनी ग्लॅमर इंडस्ट्रीत नशीब आजमावले. 1977 साली 'पहेली' चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
अरुण गोविल यांनी टीव्हीवर रामची भूमिका करण्यापूर्वी अनेक बॉलिवूड चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. अरुण गोविल यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये 'सावन को आने दो', 'राधा और सीता', 'सांच को आंच नहीं' आणि 'हिम्मतवाला' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले, पण खऱ्या अर्थाने त्यांना 'रामायण'मध्ये भगवान राम म्हणून लोकप्रियता मिळाली.
खऱ्या आयुष्यात टीव्हीच्या राम म्हणजेच अरुण गोविल यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांची संपत्ती जवळपास 5 दशलक्ष म्हणजेच 38 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते, तर गेल्या काही वर्षांत त्याची एकूण संपत्ती वाढली आहे. अरुण गोविलच्या उत्पन्नाच्या स्रोताबद्दल सांगायचे तर, तो अभिनय आणि जाहिरातींमधून चांगली कमाई करतात.
विशेष म्हणजे अरुण गोविल यांचे मुंबईत एक आलिशान घर आहे, ज्यामध्ये ते संपूर्ण कुटुंबासह राहतात. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी श्रीलेखा गोविल, त्यांची दोन मुले अमल आणि सोनारिका यांचा समावेश आहे. अरुण गोविलची पत्नी देखील अभिनेत्री आहे.