सना खान आणि अनस सय्यद यांच्या यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. हे जोडपे नुकतेच आईबाबा झाले आहेत. सना खानने मुलाला जन्म दिला आहे. खुद्द अभिनेत्रीने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. मुलगा झाल्यानंतर सनाच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यामुळेच सनाने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर अतिशय मजेशीर पद्धतीने शेअर केली आहे.
सना खानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये या जोडप्याच्या हाता एक छोटासा हात दिसत आहे. व्हिडिओमध्ये लिहिले आहे की, "अल्लाह तआलाने नशिबात लिहिले, मग ते पूर्ण केले, सोपे केले आणि जेव्हा अल्लाह देतो तेव्हा आनंदाने देतो. त्यामुळे अल्लाहने आम्हाला मुलगा दिला आहे." ही पोस्ट शेअर करताना सनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "अल्लाह आम्हाला आमच्या बाळासाठी आमचे सर्वोत्तम आवृत्ती दे. अल्लाह की अमानत है. ये सर्वोत्तम है."
या आनंदाच्या प्रसंगी सनाने तिच्या चाहत्यांचे आणि जवळच्या मित्रांचे आभार मानले आणि लिहिले- "तुमच्या प्रेम आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद, ज्यांनी आम्हाला खूप आनंद दिला आणि आमचा प्रवास आनंदी केला."
सना खानचा पती अनस सय्यद नुकताच हजहून परतला आहे, सध्या त्यांच्या कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. या पोस्टवर सेलेब्स आणि चाहते सनाचे अभिनंदन करत आहेत.
काही वर्षांपूर्वी सना खानने अचानक अभिनयाला अलविदा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. यानंतर तिने 2020 मध्ये अनस सय्यदसोबत गुपचूप लग्न केले होते. लग्नाच्या 3 वर्षानंतर, हे जोडपे पालक बनले आहे.